हॉलिवूड स्टारच्या घरी केली होती ७० कोटींची चोरी, आता पुस्तकातून समोर आणणार चोरीची कहाणी....

Published: February 5, 2021 03:53 PM2021-02-05T15:53:30+5:302021-02-05T16:10:34+5:30

फ्रेंच वृत्तपत्र ले मोंडे नुसार, या चोरीत सामिल आणखी एका व्यक्तीचं म्हणणं होतं की, किमच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्यासाठी हा प्लॅन बनवणं सोपं झालं होतं.

रिअॅलिटी टीव्ही आणि सोशल मीडिया स्टार किम कार्दशियांच्या घरी पाच वर्षांआधी ७० कोटी रूपयांची चोरी झाली होती. २०१६ मध्ये पॅरिसच्या फॅशन वीकदरम्यान किमच्या अपार्टमेंटमध्ये काही लोक शिरले होते आणि तिला बंदी बनवलं होतं. आता या केसमधील एक आरोपी एक व्यक्ती या घटनाक्रमावर एक पुस्तक प्रकाशित करणार आहे. ६७ वर्षीय यूनिस अब्बासच्या या पुस्तकाचं नाव 'आय किडनॅप किम कार्दशियां' असं आहे.

यूनिस त्या १२ लोकांपैकी एक आहे ज्यांना या किडनॅपिंग केसमध्ये अटक करण्यात आली होती. यूनिस म्हणाला की, जर त्याला माहीत असतं की, किम इतकी लोकप्रिय आहे तर तो या चोरीत कधीच सामिल झाला नसता. अब्बास म्हणाला की, तो एका गॅंग ग्रॅंड डॅड रॉबर्सचा भाग होता. या गॅंगमध्ये सर्वच ६० ते ७२ वयोगटातील लोक होते.

अब्बासला त्याच्या एका मित्राने विचारले होते की, तू या गॅंगचा भाग होशील का? या व्यक्तीने अब्बासला इशारा देताना सांगितले होते की, ही एक लोकप्रिय स्टार आहे आणि एका अमेरिकन रॅपरची पत्नी आहे.

अब्बास म्हणाला की, मी कोणत्याहील लोकप्रिय रॅपरला ओळखत नव्हतो. मला वाटत होतं की, जर मला एखाद्या गोष्टीबाबत काही माहीत नसेल तर इतरांनाही त्याबाबत माहीत नसेल.

याच कारणामुळे अब्बास या चोरीत सामिल झाला होता. पण तो जसाही किमच्या बिल्डींगमध्ये शिरला त्याला याची जाणीव झाली की, ती खरंच मोठी स्टार आहे आणि त्याने कधी विचारही केला नव्हता की, तो इतक्या श्रीमंत महिलेच्या घरी चोरी करायला जात आहे. अब्बास म्हणाला की, त्याने किमवर हल्ला केला होता आणि त्यानेच किमला बांधून बेडच्या डाव्या बाजूला बसवलं होतं.

मात्र, या चोरीनंतर किमने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला बाथरूममध्ये नेऊन बंद करण्यात आलं होतं. याबाबत अब्बास म्हणाला की, होऊ शकतं की, किमने तो प्रसंग अधिक रंगवून सांगितला असेल. कारण ती शो बिझनेसमध्ये आहे.

तिच्यासाठी या गोष्टी फायद्याच्या आहेत. या व्यक्तीने त्याच्या पुस्तकात दावा केला आहे की, किम आणि तिची सेक्रेटरी पुन्हा पुनहा ९११ डायल करत होत्या. पण त्या यावेळी पॅरिसमध्ये होत्या. अशात ९११ डायल करून काहीच फायदा नव्हता.

अब्बासने सांगितले की, जेव्हा किमला जाणीव झाली की, हे लोक त्यांना मारण्यासाठी नाही तर केवळ चोरी करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी चोरांचं म्हणणं ऐकलं. एएफपीसोबत बोलताना हा व्यक्ती म्हणाला की, ही चोरी फार लवकर झाली.

एंट्रीपासून ते एक्झिटपर्यंत केवळ ६ ते ७ मिनिटे लागले होते. कारण सगळंकाही सफाईने झालं. कुणीही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि घरातील लोकांनी आम्हाला दागिने दिले.

अब्बास म्हणाला की, मी चोरी केल्यानंतर दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तेव्हाच मी पाहिलं होतं की, रात्रपाळीचे पोलीस फिरत होते. मी त्यांना सल्यूट केला आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही.

फ्रेंच वृत्तपत्र ले मोंडे नुसार, या चोरीत सामिल आणखी एका व्यक्तीचं म्हणणं होतं की, किमच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्यासाठी हा प्लॅन बनवणं सोपं झालं होतं. किमने तिची ज्वेलरी सोशल मीडियावर दाखवली होती. आणि तिने दावा केला होता की, ही ज्वेलरी फेक नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!