जॉनी डेपची एक्स वाइफ एम्बर हर्डचं Elon Musk सोबत काय आहे नातं? लिफ्टमधील रोमान्सच क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:03 PM2022-05-19T16:03:04+5:302022-05-19T16:39:18+5:30

Amber Heard Elon Musk relationship : ही कोर्ट केस एखाद्या टीव्ही शोपेक्षा कमी नाहीये. यात रोज जॉनी आणि एम्बरच्या नात्यासंबंधी छोट्या छोट्या हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत.

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची एक्स वाइफ अभिनेत्री एम्बर हर्ड यांच्यातील सुरू असलेली कोर्ट केस दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे. जॉनी डेपकडून एकापाठी जबरदस्त साक्षीदार आणि पुरावे सादर केले जात आहेत. तेच एम्बर रोज तिच्या जबाबावरून पलटी मारताना दिसत आहे.

ही कोर्ट केस एखाद्या टीव्ही शोपेक्षा कमी नाहीये. यात रोज जॉनी आणि एम्बरच्या नात्यासंबंधी छोट्या छोट्या हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या केसमध्ये अनेकदा जगतील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क याचंही नाव समोर आलं आहे.

एम्बर हर्ड आणि एलन मस्क यांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. जॉनीने आधी आरोप लावला होता की, एम्बर आणि एलनचं अफेअर सुरू होतं. आता सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एम्बर आणि एलनला जॉनी डेपच्या पेंटहाउसच्या लिफ्टमध्ये सोबत बघण्यात आलं. दोघेही रोमॅंटिक होताना व्हिडीओत दिसत आहेत.

एम्बर हर्डचं नातं एलन मस्कसोबत तेव्हा सुरू झालं होतं जेव्हा तिने जॉनी डेपला घटस्फोट दिला होता. एका वर्षात एम्बर एलनपासूनही वेगळी झाली. २०१८ मध्ये दोघे पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. पण काही महिन्यांनी पुन्हा वेगळे झाले. कोर्टात जॉनी डेपच्या वकिलांनी व्हिडीओ फुटेज जारी केलं.

या व्हिडीओत एम्बरला एलनसोबत लेट नाईट 'मीटिंग्स' साठी भेटताना बघता येतं. तेच जॉनीने आपल्या केसमध्ये आरोप केला आहे की, एलनसोबत एम्बरचं अफेअर त्यांचं २०१५ मध्ये लग्न झाल्याच्या एक महिन्यानंतरपासून होतं.

बिलिअनेअर एलन मस्कसोबत एम्बर हर्डची भेट एका सिनेमाच्या सेटवर झाली होती. २०१३ मध्ये या सिनेमात एम्बरने एक भूमिका केली होती. तेच एलन या सिनेमात कॅमिओ करत होता. २०१६ मध्ये एम्बर आणि जॉनीचा घटस्फोट झाला होता.

एलन मस्कने सुद्धा त्याची पत्नी Talulah Riley ला त्याच वर्षी घटस्फोट दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार तेव्हाच दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. तेच कोर्टात दिलेल्या आपल्या जबाबात एम्बर म्हणाली की, ती एलन मस्कला पहिल्यांदा २०१६ मध्ये मेट गालामध्ये भेटली होती.

२४ एप्रिल २०१७ ला एम्बर हर्डने एलन मस्कसोबतचं तिचं नातं इन्स्टावर ऑफिशिअल केलं होतं. तिने एक फोटो शेअर केला होता. ज्यात दोघेही एका रेस्टॉरन्टमध्ये बसलेले दिसले. एलनच्या गालावर लिपस्टिकचं निशाणही आहे.

त्यावेळी पीपल मॅगझिनने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितलं होतं की, 'ते दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखतात. दोघे आधी मित्र होते. एलन नेहमी एम्बरला पसंत करत होता. जेव्हा गेल्यावर्षी दोघे सिंगल झाले तेव्हा एलनने तिच्यासोबत रोमॅंटिक नात्याला सुरूवात केली'.

जॉनी डेप आणि एम्बर हर्डच्या केसमध्ये कोर्टात अनेक कागदपत्रे देण्यात आली. यातीलच एकात सांगण्यात आलं की, एलनने एम्बर हर्ड आणि मॉडल Cara Delevingne सोबत जॉनीच्या लॉस एंजलिसच्या अपार्टमेंटमध्ये थ्रीसम केलं होतं. हे त्यांनी २०१६ मध्ये केलं होतं.

तेव्हा जॉनी शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियात होता. आरोप असाही आहे की, एम्बर आणि एलनच्या अफेअरची सुरूवात तिच्या जॉनी डेपच्या घटस्फोटाआधी २०१६ मध्ये झाली होती. पेज सिक्ससोबत बोलताना एलनने एम्बर सोबतच्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. सोबतच थ्रीसमचे आरोप फेटाळले होते. एलन म्हणाला होता की, 'कारा आणि मी मित्र आहोत. पण आम्ही कधी असं काही केलं नाही. ही बाब ती कन्फर्म करू शकते.

मला हे पुन्हा स्पष्ट करायचं आहे की, मी आणि एम्बरने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यावर एक महिन्यांनी डेटिंग सुरू केलं होतं. तिच्या लग्नादरम्यान आम्ही सोबत नव्हतो'. कोर्टात एम्बर हर्डने एलन मस्कचं कौतुकही केलं. ती म्हणाली की, २०१६ मध्ये मेट गाला वेळी एक्स हसबंड जॉनी डेपने तिला दगा दिला आणि इव्हेंटमध्ये पोहोचला नव्हता.

हीच ती रात्र होती जेव्हा तिची भेट एलनसोबत झाली. एम्बरनुसार, ते रेड कार्पेटवर एलनसोबत भेटली होती. दोघे जवळ बसले होते आणि दोघे रात्रभर बोलले होते. त्यानंतर त्यांचं नातं सुरू झालं.