बापरे! एक पिझ्झा खाल्ल्याने 7.8 मिनिटांनी कमी होतं आयुष्य; 'या' पदार्थांपासून वेळीच राहा लांब नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:53 PM2022-08-14T16:53:07+5:302022-08-14T17:01:51+5:30

कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर आयुष्य कमी होतं आणि कोणत्या खाल्ल्यानंतर वाढतं हे जाणून घेऊया.

आजच्या धावपळीच्या जगात स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. पण तरीही प्रत्येकाला वाटत असतं की आपण दीर्घायुषी व्हावं. वर्ल्ड लाइफ एक्सपेक्टेंसीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात पुरुषांचे सरासरी आयुष्य 69.5 वर्ष आहे, तर महिलांचं आयुष्य 72.2 वर्ष इतके आहे. ह्रद्याशी संबंधित आजार, फुफुस्सांचे आजार, स्ट्रोक, मधुमेह यासारखे किमान 50 असे आजार आहेत, ज्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते. तुम्ही मृत्यूला लवकर निमंत्रण देऊ शकता.

विज्ञानानुसार, काही पौष्टिक पदार्थांचा अन्नात समावेश असेल तर तुमचं वय हे वाढू शकतं. पण त्याचबरोबर जर तुमच्या अन्नात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश नसेल तर तुमचे आयुष्य हे कमी देखील होऊ शकतं. द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, मिशिगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी खाण्याच्या काही वस्तूंबाबत रिसर्च केला आहे.

खाद्यपदार्थांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला. रिसर्चमध्ये असे काही अन्नपदार्थ आहेत, ज्यांचे एकदाही सेवन केले तरी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. म्हणजेच काही पदार्थांच्या सेवनाने आयुष्य वाढतं तर काही पदार्थ खाल्ले तर ते कमी देखील होऊ शकतं.

उदाहरणार्थ जर तुम्ही पीनट बटर आणि जॅम सँडवीच खाल्लं तर तुमचं आयुष्य हे अर्ध्या तासाने वाढेल आणि दरे तुम्ही एक हॉटडॉग खाल्ला तर तुमचे आयुष्य 36 मिनिटांनी कमी होऊ शकते. नेचर फूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, हा अभ्यास जगण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक आहे. या अभ्यासात संशोधकांनी सुमारे सहा हजार वेगवेगळे पदार्थ त्यात नाश्ता, जेवण आणि पेय यांचा अभ्यास केला.

कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर आयुष्य कमी होतं आणि कोणत्या खाल्ल्यानंतर वाढतं हे जाणून घेऊया. एका पिझ्झ्यामुळे जगण्यातील 7.8 मिनिटे कमी होतील. चीज बर्गर खात असाल तर तुमचे आयुष्य़ 8.8 मिनिटे कमी होईल. सॉफ्ट ड्रिंकमुळे जगण्यातील 12.4 मिनिटे कमी होतील. प्रोसेस्ड मीट (बेकॉन) खाल्ल्याने जगण्यातील 26 मिनिटे आणि हॉट ड़ॉग खाल्ल्याने जगण्यातील 36 मिनिटे कमी होतील.

असेही काही पदार्थ आहेत, ज्यांचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारात केलात, तर तुमचे आयुष्य वाढू शकेल. पीनट बटर आणि जॅम सँडविच खाल्ले तर आयुष्य 33.1 मिनिटांनी वाढू एक केळ्याचा जर रोज आहारात समावेश केला तर आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढू शकेल. एका टोमॅटोमुळे 3.8 मिनिट तर अवोकाडोमुळे 1. 5 मिनिटांनी आयुष्य वाढेल.

संशोधनातून लोकांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी जागरुकता निर्माण होईल आणि त्यानुसार ते त्यांच्या आहारात बदल करतील, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जगण्यात फास्ट फूडच्या जमान्यात सगळ्यांनीच त्यांच्या आहारात बदल करण्याची गरजही, संशोधकांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.