मासिक पाळीदरम्यानच्या वेदनांनी त्रस्त ? करुन पाहा हे ५ उपाय, मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 05:52 PM2018-02-16T17:52:43+5:302018-02-16T18:31:48+5:30

मासिक पाळीत स्त्रीला किती वेदना होतात याची कल्पना फक्त स्त्रीच करु शकते. या वेदनांमुळे महिन्याचे ते चार दिवस स्त्रियांना नकोसे होतात. मासिक पाळीपासून दूर पळणं शक्य नाही पण त्याच्या वेदना कमी करणं सहज शक्य आहे. ज्या स्त्रियांना दर महिन्याला या वेदना होतात त्यांनी त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. तसंच या गोष्टी करणं त्यांच्या आरोग्यासाठीसुद्धा उपयोगाचं असतं.

१) बीट - आहारात बीटाचा समावेश केल्याने रक्तस्त्राव कमी होतो. तसंच त्या ५ दिवसांदरम्यान थकवाही जाणवत नाही. बीट खाल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात उर्जा तयार होते. पाळीदरम्यान दुषित रक्त शरीराबाहेर टाकलं जात असल्याने रक्ताची पातळी पुर्ववत करण्यासाठी बीटाची मदत होते. तसंच शरीरातील रक्त वाढवण्यात बीट उपयोगी पडतं.

२) ब्लु बेरीज – ब्लु बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टीआँक्सिडन्ट्स असल्याने शरीरात टॅाक्नि्सची उत्पत्ती कमी होते. तसंच मासिक पाळीच्या वेदनांची तीव्रता कमी होते. रक्तप्रवाह पातळ होण्यासाठीही ब्लु बेरीज महत्त्वाची कामगिरी बजावतात.

३)डाळींब - अनियमित रक्तस्त्राव, अनियमित मासिक पाळी या सर्वांवर उपाय म्हणजे डाळिंबाचा रस. मासिक पाळी येण्याच्या काही दिवस अगोदर जर डाळिंबाचा रस प्यायलात तर त्याचा नक्कीच फायदा होतो. दर महिन्याला पाळी नियमित होण्यात डाळींब तुम्हाला मदत करु शकतं.

४) चॅाकलेट – मासिक पाळी आल्यावर चॅाकलेट खाल्याने शरीरात पाझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात. तसंच पाळीदरम्यान आलेला शरीराचा थकवा निघून जाऊन शरीरात उर्जा तयार होते. तसंच मासिक पाळीत होणारी चिडचिडही कमी होते.

५)लसूण - हार्मेान्समध्ये समतोल राखण्यासाठी लसूण फायदेशीर असते. मासिक पाळीत हार्मोन्सच्या असमतोलामुळे चेहऱ्यावर मुरूम येतात. त्यामुळे मासिक पाळीत आहारात लसणाचा समावेश केल्यास तुमची त्वचा स्वच्छ राहते.