Liver Infection: लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्यावर शरीर देतं हे संकेत, जाणून घ्या उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:30 PM2022-06-24T12:30:02+5:302022-06-24T12:43:47+5:30

Liver Infection Symptoms: खाणं-पिणं आणि जीवनशैलीसंबंधी चुका किंवा चुकीच्या सवयी यामुळे लिव्हरशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका राहतो.

Liver Infection Symptoms: लिव्हर शरीरातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतं. त्यासोबतच शरीरात ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करणं प्रोटीनचं संतुलन ठेवणं आणि ग्लुकोजला एनर्जीमध्ये बदलणं हेही लिव्हरचंच काम असतं. पण खाणं-पिणं आणि जीवनशैलीसंबंधी चुका किंवा चुकीच्या सवयी यामुळे लिव्हरशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका राहतो. अशात लिव्हरमध्ये इन्फेक्शन होण्याचाही धोका राहतो. यामध्ये लिव्हर इन्फेक्शनच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला लिव्हर फेलिअरचा धोकाही राहतो. त्यामुळे लिव्हर इन्फेक्शनची लक्षणं तुम्हाला माहीत असायला हवीत.

पोटात सूज आणि वेदना - लिव्हर इन्फेक्शन झाल्यावर सुरूवातील तुमच्या पोटात सतत दुखतं आणि सूजही येते. लिव्हरसंबंधी सर्वत समस्यांमध्ये तुम्हाला ही समस्या होऊ शकते. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

काविळ होण्याची समस्या - लिव्हरसंबंधी एक गंभीर समस्या आहे काविळ. शरीरात असलेलं एक केमिकल बिलीरूबिनचं प्रमाण वाढलं की, तुम्हाला काविळीची समस्या होऊ शकते. लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं तर तुम्हाला काविळीची समस्या पुन्हा पुन्हा होते.

त्वचेवर खाज आणि रॅशेज - लिव्हर इन्फेक्शनच्या समस्येत त्वचेवर खाज आणि रॅशेज सर्वात कॉमन आहे. त्वचेवर रॅशेज आणि खाज वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतात. पण जर तुम्हाला पुन्हा पुन्हा ही समस्या होत असेल तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये.

भूक कमी लागणे - भूक कमी लागणे यालाही लिव्हर इन्फेक्शन किंवा लिव्हर खराब झाल्याचा संकेत मानलं जातं. लिव्हरचा एक भाग शरीरात जाणारं अन्न पचवण्यात मदत करतं. ज्यामुळे लिव्हर इन्फेक्शन झाल्यावर तुम्हाला भूक कमी लागते आणि जेवण करण्याची इच्छा होत नाही.

लघवीचा रंग बदलणे - लघवीचा रंग बदलणे हाही लिव्हर खराब होण्याचा संकेत मानला जातो. काविळीच्या समस्येतही तुम्हाला हे लक्षण दिसू शकतं. लघवीच्या रंगात बदल झाल्यावर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

उलटी आणि मळमळ - उलटी आणि मळमळ होण्याची समस्या तुम्हाला पुन्हा पुन्हा होत असेल. अनेक उपचार घेऊनही ही समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावं याचे काही उपाय खालीलप्रमाणे सांगता येतील.

वजन नियंत्रित करा - अचानक वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याची अट्टाहास करू नये. कारण हे क्रश डाएटचे परिणाम असतात जे लिव्हरला प्रभावित करतात. वजन कमी करण्याची प्रक्रिया हळुवार आणि स्थिर असावी.

फॅटपासून रहा दूर - ओेमेगा 3 फॅटी अॅसिड, फिश ऑइल, ऑलिव ऑइल, कनोला ऑइल, एवोकाडो आणि प्लॅक्सीडमधून मिळणारं फॅट लिव्हरसाठी चांगलं असतं. मांस आणि लोणी किंवा इतर डेअरी उत्पादनांमधील फॅटने लिव्हर फॅटी होण्याचा धोका वाढतो.

आहारात फायबरचा समावेश - आहारात जास्तीत जास्त प्रमाणात फायबर किंवा रेशोचा समावेश करा. त्यासोबतच कॅल्शिअमचं भरपूर प्रमाण असणाऱ्या खाद्य पदार्थांचंही सेवन करा.

व्यायाम - शरीर सुस्त पडून राहिल्याने रोगाचा धोका वाढतो आणि त्यामुळे पचनक्रियाही सुस्त होते. सोबतच पोटही साफ होत नाही. यामुळे बाइल ज्यूस गॉल बाहेर निघत नाही आणि याने लिव्हर प्रभावित होतं.

भरपूर पाणी प्या - कोणताही आजार खासकरून गॅस्ट्रोनॉमिकल अवयव सामिल असतात, त्यापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे पाणी आहे. भरपूर पाणी प्या आणि हे अवयन निरोगी ठेवा.