Sex Life Survey of Indians: घरापासून दूर राहणाऱ्या भारतीय महिला परपुरुषांशी जादा शरीर संबंध ठेवतात? सर्व्हेतून धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:41 PM2022-05-19T14:41:12+5:302022-05-19T15:12:10+5:30

Sex Life Survey of Indian womens: घरात जे वातावरण असते त्याच्या उलट परिस्थिती बाहेर गेल्यावर असते. नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्व्हेमध्ये एड्ससारख्या गंभीर आजारांचा धोका जाणण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.

देशात आता लोकांनी सेक्स लाईफबद्दल बोलण्यास खुलेपणे नसली तरी सुरुवात केली आहे. परंतू लैंगिक शिक्षण किंवा लाज वाटत असल्याने अनेकदा लोकांना खतरनाक आजारांना सामोरे जावे लागते. नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्व्हेमध्ये एड्ससारख्या गंभीर आजारांचा धोका जाणण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले.

यामध्ये पहिल्यांदा सेक्स केला ते वय, किती व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवले, शरीर संबंधांसाठी पैसे मोजले आदी विषयांवर प्रश्न होते. या सर्व्हेनुसार एकापेक्षा अधिक सेक्स पार्टनर, पती-पत्नी किंवा घरात राहणाऱ्या पार्टनरव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवले तर एचआयव्ही लागण होण्याचा धोका खूप वाढतो असे समोर आले आहे.

या सर्व्हेमध्ये १५ ते ४९ वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या गेल्या १२ महिन्यांची सेक्स लाईफ जाणून घेण्यात आली. यात ०.३ टक्के महिलांनी आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा अधिक लोकांसोबत शरीर संबंध ठेवल्याचे म्हटले. तर ०.५ टक्के महिलांनी आणि ४ टक्के पुरुषांनी पती-पत्नी किंवा घरातील व्यक्तीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवल्याचे कबुल केले.

लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.

पुरुष आणि महिला सरासरी सात दिवसांच्या अंतराने सेक्स करतात. वृद्ध स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधासाठीचे हे अंतर वाढते. वयाच्या 45 व्या वर्षी, स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधांचे अंतर 7 दिवसांपासून 20 ते 21 दिवसांपर्यंत वाढते. मात्र, पुरुषांमध्ये उलटा कल दिसून आला.

वयाच्या 20 व्या वर्षी, 16 दिवसांच्या संभोगाचा कालावधी वयाच्या 45 व्या वर्षी 8 दिवसांवर येतो. अविवाहित लोकांच्या तुलनेत विवाहित पुरुष आणि स्त्रिया कमी वेळा लैंगिक संबंध ठेवतात, असे समोर आले आहे. लोक जेव्हा घराबाहेर राहतात तेव्हा लैंगिक संबंधाशी संबंधित हे आकडे बदलू लागतात.

घरापासून दूर असलेल्या महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळा सेक्स करतात. महिला एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर राहतात तेव्हा त्यांच्या सेक्स पार्टनरची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण २.१ आहे. 56 टक्के महिला यात मुलीदेखील घरापासून लांब असल्यावर जास्त सेक्स करतात. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३२ टक्के आहे.

घरापासून लांब असल्यावर महिला सेक्सवेळी वेगवेगळे प्रयोग करतात. यामध्ये एकाचवेळी दोन किंवा अधिक पार्टनरसोबत शरीर संबंध ठेवणे किंवा पतीशिवाय अन्य व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवणे हे प्रयोग आहेत.

खूप कमी महिला सेक्ससाठी पैसे मोजतात. म्हणजेच पैसे देऊन शरीर संबंध ठेवणे टाळतात. मात्र, पुरुषांमध्ये हे प्रमाण खूप आहे. ५३ टक्के पुरुष पैसे देऊन सेक्स करतात तर महिलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे.