Oxygen: शरीरात ऑक्सिजन पातळी कमी होतेय? जाणून घ्या केव्हा येते हॉस्पिटलमध्ये जाण्याची दुर्देवी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:23 PM2021-04-24T17:23:30+5:302021-04-24T17:29:03+5:30

Oxygen: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावतेय. अनेकजण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

कोरोना व्हायरसच्या महामारीनं देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटने श्वास घेण्याची समस्या सर्वाधिक उद्भवत आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन देणं गरजेचे नाही परंतु एका रुग्णाला कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हे जाणून घेऊया.

ऑक्सिजन सॅच्यूरेशन काय आहे? ऑक्सिजन सॅच्यूरेशन फुस्फुस आणि इतर शरीराला जाणारं रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वाढवतं. शरीरातील यंत्रणा सुरळीत करण्यासाठी मदत करतं. रिडिंगमध्ये ९४ पेक्षा जास्त पातळी असणारे धोक्याचे बाहेर असतात. कोरोना झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी वेगाने कमी होते.

तज्ज्ञांच्या मते, SpO2 पातळी ९४ ते १०० मध्ये असणं हे निरोगी असण्याचे संकेत आहेत. तर ९४ च्या खाली गेल्यास ते हायपोस्केमिया ट्रिगर करू शकतं. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली गेली तर धोक्याची घंटा आहे. तुम्हाला तातडीनं उपचाराची गरज भासेल.

इंटेसिव ऑक्सिजन सपोर्ट – श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे हे शरीरातील ऑक्सिजन खालावण्याचे संकेत आहेत. काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालवल्याने त्यांना रेस्पिरेटरी इंफेक्शनचा त्रास होतो. शरीराती ऑक्सिजनचा कमतरता आणि श्वास घेण्यास अडचण योग्य पद्धतीने थांबवू शकतो. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. रुग्णांची अवस्था गंभीर असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागेल.

जर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ च्या वर असेल तर घाबरण्याची गरज नाही. जर ऑक्सिजन पातळी ९१-९४ मध्ये असेल तर शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर ऑक्सिजन पातळी १-२ तास सलग ९१ च्या खाली जात असेल तर तात्काळ उपचारांची गरज आहे.

कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांबाबत सगळेच जागरूक आहेत. परंतु यात काही अशी लक्षणं आहेत जे लोकांच्या नजरेस येत नाहीत. चेहऱ्यांवरील रंग उडणे, होठांवर निळेपणा, रक्तात ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण, हेल्दी ऑक्सिजेनेटेड ब्लडमुळे आपली त्वचा लाल अथवा गुलाबी रंगाशी जुळते.

कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खालावते. त्यावेळी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि वारंवार खोकल, अस्वस्थपणा, डोकेदुखी अशी लक्षणं आहेत. अशावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल होणं गरजेचे आहे.

सोशल मीडियात असे दावे केले जातात की, वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होऊन श्वास घेण्याची समस्या दूर होते. त्यासाठी लोक पाणीत तेल टाकून वाफारा घेतात. परंतु यामागे कोणतंही वैज्ञानिक पुरावा नाही. वारंवार वाफारा घेतल्याने फुस्फुस्सांना नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते.

रक्तात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूपर्यंत रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो.त्यामुळे रुग्णाला चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, कॉन्सनट्रेशनमध्ये कमी आणि विज्युअल डिसॉर्डरसारख्या समस्या उद्भवू शकतात.

सोशल मीडियात असे दावे केले जातात की, वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होऊन श्वास घेण्याची समस्या दूर होते. त्यासाठी लोक पाणीत तेल टाकून वाफारा घेतात. परंतु यामागे कोणतंही वैज्ञानिक पुरावा नाही. वारंवार वाफारा घेतल्याने फुस्फुस्सांना नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते.