किडनी स्टोनच्या वेदनेतून सुटका हवी असेल तर करा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 02:32 PM2022-08-12T14:32:40+5:302022-08-12T14:46:44+5:30

Kidney Stone : काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

किडनी स्टोन झाल्याने सतत पोटात खूप जास्त दुखणं सुरु होतं. त्यासोबतच सतत लघवीला जावं लागणं, शौचास गेल्यास त्रास होणं, खूप जास्त घाम येणं आणि ओमेटींग होणं या समस्या होतात.

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

1) लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल - वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा.

2) डाळिंब - डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता.

3) कलिंगड - मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

4) राजमा - राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. याला किडनी बिन्स नावानेही ओळखलं जातं. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो.

5) व्हीट ग्रास - व्हीट ग्रास पाण्यात उकडून थंड करा. याच्या नियमित सेवनाने किडनी स्टोन आणि किडनीशी निगडीत इतरही आराम मिळतो. यात काही प्रमाणात लिंबाचा रस मिश्रित करुन प्यायल्यास आणखी फायदा होतो.