Monkeypox virus: मंकीपॉक्स म्हणजे काय? जाणून घ्या आजाराची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:46 AM2022-05-22T10:46:20+5:302022-05-22T10:51:51+5:30

मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

कोरोनाच्या मगरमिठीतून जग आता कुठे मोकळा श्वास घेत असतानाच मंकीपॉक्स नावाच्या विचित्र आजाराने डोके वर काढले आहे.

सध्या या विचित्र आजाराने त्रस्त असलले रुग्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली. पाहू या काय आहे नेमके प्रकरण...

लक्षणे काय आहेत? ताप येऊन अंगभर पुरळ उठून कालांतराने त्याचे फोडांत रुपांतर होते. अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा हेही लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत वाढत जाते.

कुठे आढळले रुग्ण? मंकीपॉक्सचे रुग्ण अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत आढळले आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक रुग्ण या देशांमध्ये सापडले आहेत. सुदैवाने तूर्त तरी भारतात या आजाराचा एकही रुग्ण नाही.

फैलाव कसा होतो? मंकीपॉक्सचा विषाणू डबल स्टँडर्ड आहे. संशोधकांच्या मते हा आजार उंदीर, खार, उंदराचे मांस इत्यादींपासून पसरतो.

काय काळजी घ्यावी? मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.