मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी वापरा या 10 टिप्स, होणार नाही पोटासंबंधी कोणतीही समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:24 PM2022-06-27T16:24:01+5:302022-06-27T16:38:44+5:30

Metabolism : स्लो मेटाबॉलिज्ममुळे भूक लागत नाही, अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटात बद्धकोष्टतेची समस्या कायम राहते. तसेच खराब मेटाबॉलिज्मचे संकेत तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतात.

Metabolism : मेटाबॉलिज्मला साध्या शब्दात सांगायचं तर ही पोटाव्दारे अन्न पचवण्याची स्पीड आहे. ज्यात गडबड झाली तर पोटासंबंधी समस्या वाढू लागतात. तुम्ही अनेकदा स्लो मेटाबॉलिज्म असा शब्द ऐकला असेल. स्लो मेटाबॉलिज्ममुळे भूक लागत नाही, अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटात बद्धकोष्टतेची समस्या कायम राहते. तसेच खराब मेटाबॉलिज्मचे संकेत तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतात. खराब मेटाबॉलिज्ममुळे त्वचेवर डलनेस येतो. अशात मेटाबॉलिज्मचा स्पीड वाढणं गरजेचं असतं. चला जाणून त्याचे 10 उपाय.

1. दालचीनीचा चहा - दालचीनीमध्ये अॅंटीऑक्सीडेंट असतात जे की, मेटाबॉलिक रेट वाढवतात आणि अन्न पचवण्यात मदत करतात. दालचीनी फॅट पचवण्यात फायदेशीर आहे आणि वेट लॉसमध्येही मदत करते. तुम्ही मेटाबॉलिज्मचा स्पीड वाढवण्यासाठी सकाळी दालचीनीचा चहा आणि रात्री झोपताना दालचीनीचा चहा प्यावा.

2. तूपाचं सेवन - तूपातील फॅटी अॅसिड्स डायजेस्टिव एंजाइम्सला वाढवतात आणि वेगाने अन्न पचण्यास मदत होते. त्यासोबतच तूप आतड्यांना चिकटपणाही देतं आणि आतड्यांची स्वच्छता करण्यासही मदत करतं. तूप अशाप्रकारे मेटाबॉलिज्म बूस्ट करू मलत्यागची प्रोसेसही वेगाने करतं.

3. आल्याचा चहा - आल्याचा चहा पोटात ब्लोटिंग होण्यापासून रोखतो आणि मेटाबॉलिज्मला बूस्ट करतो. याने अन्न सहजपणे पचतं आणि बॉवेल मुव्हमेंटही योग्य राहते. सोबतच आल्याच्या चहाचं सेवन केल्याने बॉवेल मुव्हमेंटही वेगाने होण्यास मदत होते.

4. आहारात ओव्याचा करा समावेश - आहारात ओव्याचा समावेश केल्याने पचनक्रिया वेगाने होण्यास मदत मिळते. याने डायजेस्टिव एंजाइम्सचं काम चांगलं होतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. त्यामुळे मेटाबॉलिज्म स्पीडने होण्यासाठी आहारात ओव्याचा समावेश कराच.

5. ब्रेकफास्टमध्ये खा प्रोटीनने भरपूर फूड्स - ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन असलेले भरपूर पदार्थ खाऊन तुम्ही अनेक समस्या सोडवू शकता. याने सकाळी सकाळी मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि दिवसभर पोटासंबंधी समस्याही दूर राहतात. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन असलेले दही, पनीर आणि नट्स यांचा समावेश करा.

6. जास्त सलाद खा - सलाद खाणं नेहमीच चांगल्या मेटाबॉलिज्मसाठी गरजेचं आहे. याचं कारण सलादमध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा वापर केला असतो आणि या भाज्यांमध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असतं. याने पचनक्रिया चांगली होते

7. मोड आलेल्या कडधान्याचं सेवन - मोड आलेली मुंगाची डाळ, चना डाळ आणि सोया इत्यादींमध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं. जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतं आणि पोटासंबंधी समस्याही कमी करतात.

8. बाजऱ्याची भाकरी - बाजरीच्या भाकरीमध्ये फायबर आणि रफेजचं प्रमाण भरपूर असतं. जे की, बॉवेल मुवमेंटला वेगाने करतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर करण्यात मदत करतं. जर तुम्हाला बद्धकोष्टतेची समस्या असेल तर दुपारी किंवा रात्री बाजरीची भाकरी खावी.