औषधं घेताय?; मग 'या' पदार्थांपासून राहा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:31 PM2019-11-01T15:31:07+5:302019-11-01T15:36:48+5:30

आजारी असल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. डॉक्टरही लवकर बरं व्हावं यासाठी काही औषधं देतात. मात्र औषधं घेताना काही पदार्थांपासून लांब राहणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. हे पदार्थ कोणते जाणून घेऊया.

काही औषधं ही गरम द्रव्यासोबत घेणं चांगलं नसतं. चहा, कॉफी किंवा अनेक गरम वस्तूंसोबत औषधं घेऊ नका.

संत्र, लिंबू, द्राक्ष अशा आंबट फळांच्या रसाचं सेवन करू नका. तसेच औषधं घेताना लोणचं, चिंच अशा ही आंबट गोष्टीही खाऊ नका.

केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्याने ते शरीरासाठी चांगलं असतं. मात्र ब्लडप्रेशरची औषधं घेताना केळ खाऊ नका.

औषधांचं सेवन केल्यावर लगेचच दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू नका कारण यामुळे रिअ‍ॅक्शन होऊ शकते.

औषधं घेतल्यावर चुकून सुद्धा सोडा अथवा कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करू नका. शरीरासाठी असं करणं घातक ठरू शकतं.