माहितही नसतील, सकाळी उठल्या उठल्या शिंका येण्याची 'ही' मोठी कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 06:04 PM2020-03-25T18:04:05+5:302020-03-25T18:14:54+5:30

अनेकजणांना फक्त हिवाळा आणि पावसाळा नाही तर वर्षाचे १२ महिने सर्दीचा त्रास होतो. सतत शिंका येत असतात. पण रोज झोपेतून उठ़ल्यानंतर शिंका येत असतील तर काळजी करण्याासारखी गोष्ट आहे.

कारण तुम्ही साधी सर्दी किंवा एलर्जी म्हणून याकडे दुर्लक्ष करत असला तर हीच गोष्ट मोठ्या आजारांचं कारण सुद्धा ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत कारणं.

एलर्जी- वैद्यकीय भाषेत को एलर्जिक राइनाइटिस असं सुद्धा म्हटलं जातं. घरातील धूळ, पाळीव प्राण्याचे केस आणि फंगल बॅक्टेरियांमुळे शिंका येण्याचा त्रास होत असतो. कारण श्वसननलिका अतिसंवेदनशील असते. अनेकांना अंथरूणातील उशा आणि चादरींमुळे सुद्धा एलर्जी होत असते.

तुमची खोली- एअर कंडीशनमुळे ड्राय नोजची समस्या सगळ्यात जास्त जाणवत असते. जास्तवेळपर्यंत एअर कंडीशन रूममध्ये बसल्यामुळे शरीर शुष्क होतं आणि सकाळी उठल्यानंतर शिंका येतात.

तुम्हाला सायनस आहे का- सायनसमुळे नाकाच्या आत एक लाईन तयार होत असते. त्याला नेजल लाईनिंग असं म्हणतात. त्यामुळे डोकं जड होणं. नाकाच्या आजूबाजूला दुखणं, नाक चोंदणं तसचं सर्दी होण्याची समस्या उद्भवत असते, त्यामुळेच शिंका येतात.

सूर्याचा संपर्क- वैद्यकिय भाषेत या स्थितीला फोटिक स्‍नीज रिफ्लक्‍स असं म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात श्वसनसंस्थेला उत्तेजना मिळत असतात. त्यामुळे शिंका येतात आणि त्यांना नियंत्रणात आणता येत नाही. या उत्तेजनांमध्ये सूर्याशी संपर्क आल्यानंतर सुद्धा समस्या निर्माण होते.

वासोमोटर राइनाइटिस -या प्रकारात नाकाला आतल्या बाजूने सुज येत असते. जास्त तापमान किंवा झोपेदरम्यान शरीरात झालेले बदल याच कारण ठरतात. तुम्हालासुद्धा ही समस्या उद्भवत असेल तर थंड किंवा गरम हवेच्या संपर्कात येणं हेच कारण शिंका येण्यसाठी कारणीभूत असतं.