लॉकडाऊनमध्ये नसांचं दुखणं घालवण्यासाठी 'हे' उपाय कराल, तर सतत दवाखान्यात जाणं विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:27 PM2020-04-02T12:27:35+5:302020-04-02T13:10:05+5:30

सध्याच्या काळात वातावरणातील बदलांमुळे फक्त वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांना सुद्धा नसांच्या दुखण्याचा त्रास होत असतो. जीवनशैलीत होणारे बदल आणि नसांमध्ये दुखण्याची समस्या वाढत चालली आहे. या आजारांसाठी साधारणपणे फिजिओथेरेपी किंवा औषधं दिली जातात.

ही औषधं अनेकदा महागडी असल्यामुळे घेणं शक्य होत नाही. म्हणून मोठ्या आजारांमध्ये रुपांतर होत जातं. आज आम्ही तुम्हाला नसांच्या दुखण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. लॉकडाऊनमध्ये असलेल्या वेळेत तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

जखम झाल्यानंतर किंवा नसांमधून रक्त निघाल्यानंतर, मल्‍टीपल स्‍केलेरोसिस, जास्त मद्याचे सेवन, त्यााच इलाज यासाठी सर्जरी, किमोथेरेपी, डायबिटीस या कारणांमुळे नसा दुखण्याची समस्या उद्भवू शकते.

दारू जास्त प्यायल्याने नसांच्या दुखण्यात वाढ होऊ शकते. तंबाखू नसांना रक्तप्रवाह नसांना सुरळित होण्यापासून थांबवतात. कोणीही व्यक्ती या आजारापासूनग्रस्त असेल तर मादक पदार्थांचं सेवन करणं टाळायला हवं.

नियमीत व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला अवयवांमधिल अशक्तपणा कमी होतो. योगा ट्रेनिंग केल्यामुळे तुम्हाला हा आजार टाळता येईल.

एक्‍यूपंक्‍चर पध्दतीचा वापर करून तुम्ही शरीराच्या आतील सुज कमी करून कार्यान्वित करू शकता. ही थेरेपी शरीरासाठी प्रभावशाली ठरते. त्यामुळे एंडोर्फिन आणि इतर दुखणं दूर करणारे हार्मोन्स रिलिज होत असतात. त्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.

हळदीच्या सेवनाने फायदे तुम्हाला माहितच असतील. यामुळेच तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. त्यासाठी हळदीचं दूध, किंवा रोजच्या जेवणामध्ये हळदीचा जास्तीत जास्त वापर करा. त्यामुळे नसांच्या दुखण्यापासून आराम मिळेल.

व्हिटामीन B-12 युक्त आहाराचे सेवन केल्याने नसा दुखण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश आहारात करून आरोग्य चांगलं ठेवू शकता.

नियमीत योगसाधना केल्याने तुम्ही फिट राहू शकता. त्यासाठी जमेलं तसं १५ ते २० मिनिटं जरी तुम्ही योगाचे प्रकार केलं तर शरीर चांगलं राहिल.

केमिकल्स वापर न करता घरच्याघरी हे उपाय केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. आजारपणाचा सामना करण्याासाठी तुमचं शरीर सज्ज असेल.