'या' व्हिटामीनमुळे घटतोय कॅन्सरचा धोका; बारीक शरीरयष्टीच्या लोकांना होणार फायदा- रिसर्च

By manali.bagul | Published: November 22, 2020 09:33 AM2020-11-22T09:33:39+5:302020-11-22T10:10:58+5:30

शरीराला पोषण मिळण्यासाठी प्रोटिन्स, व्हिटामीन, गुड फॅट्स हे सगळेच घटक महत्वाचे ठरतात. व्हिटामीन डी मुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव होतो. एका नवीन संशोधनानुसार व्हिटामीन डी शरीरात योग्य प्रमाणात असल्यास शरीरातील कॅन्सरचा धोका १७ टक्क्यांनी कमी होतो. व्हिटामीन डी सप्लिमेंट्सचा वापर करत असलेल्यांमध्ये या आजाराचा धोका कमी प्रमाणात दिसून आला आहे.

इतकंच नाही तर कमी बीएमआई (बॉडी मास्क इंडेक्स) किंवा सामान्य वजन असलेल्या लोकांमध्येही कॅन्सरचा धोका ३८ टक्के कमी दिसून आला. म्हणजेच व्हिटामीन डी मुळे कमी वजन असलेल्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका ३८ टक्के तर इतर लोकांमध्ये १७ टक्के कमी असतो. या संशोधनासाठी २०१३ ते २०१८ दरम्यान माहिती गोळा करण्यात आली होती.

ब्रिघम एंड वूमेन्स हॉस्पिटल (बॉस्टन)चे हे संशोधन JAMA नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. २०१८ मध्ये शास्त्रज्ञांनी दावा केला होता की, व्हिटामीन डी शरीरात कॅन्सरची वाढ होण्यापासून रोखतो. या आजारामुळे मृत्यूचा धोका कमी होतो.

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक पॉलेट चॅडलर यांनी सांगितले की, व्हिटामीन डी सहज उपलब्ध होणारं आहे. सगळ्यात स्वस्त असल्यामुळे पूर्वापार याचा वापर केला जात आहे. या संशोधनातून दिसून आलं की सामान्य वजन असलेल्या लोकांमध्ये कॅन्सरच्या आजाराचा धोका कमी असतो. यामुळे व्हिटामीन डी आणि अडवांस कॅन्सर यांच्या संबंधांबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत झाली.

सुर्यप्रकाशामुळे व्हिटामीन डी मिळतं. पण लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नाही तर व्हिटामीन डी कसे मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. घरच्याघरी काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढू शकता.

व्हिटामीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीचं वेदना, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हद्याचे ठोके वाढणं अशा समस्या उद्भवतात.

पनीर अनेकांना खायला खूप आवडतं. त्यात व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणावर असते तर नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल.

दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होते. सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटामीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्स घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.