प्लास्टिक वस्तूंवर दिसणाऱ्या 'या' चिन्हाचा अर्थ माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 06:12 PM2019-10-07T18:12:47+5:302019-10-07T18:29:26+5:30

देशभरात गांधी जयंतीपासून एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर (सिंगल यूज प्लास्टिक) बंदी लागू झाली आहे. त्यात थर्माकोलच्या वस्तू, तसेच प्लास्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. प्लास्टिकचा वापर हा केला जातो. सामानावर काही कोड देण्यात आलेले असतात. त्या कोड तसेच चिन्ह देण्यात आलेली असतात त्याचा अर्थ जाणून घेऊया.

प्लास्टिक बॉटल आणि सामानावर त्रिकोणी आकारात काही चिन्ह देण्यात आलेली असतात. त्यामध्ये काही अंक असतात. त्यालाच रेजीन आयडेंटि‍फिकेशन कोड असे म्हटले जाते. किती वेळा आपण या गोष्टी वापरू शकतो याची माहिती यामध्ये देण्यात आलेली असते.

प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंवर 1 ते 7 पर्यंत कोड देण्यात आलेले असतात.

कोल्डड्रिंक्स बॉटल, कंटेनर, ओवन-ट्रे, डिटर्जेंट आणि क्लीनरच्या कंटेनरवर हा कोड देण्यात आलेला असतो. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, गिटार, पियानो यांच्या फिनिशिंगसाठी देखील या प्लास्टिक पॉलिमरचा वापर केला जातो.

एचडीपीय म्हणजेच हाय डेंसिटी पॉलीएथिलीन.या प्लास्टिक पॉलिमरचा वापर हा प्लास्टिक बॅग, दूधाच्या पॅकेट्ससाठी केला जातो.

पीवीसी म्हणजेच पॉलीविनाइल क्लोराइड. पाईप व प्लंबिंग सारख्या कामांसाठी याचा वापर केला जातो. शँपूची बॉटल, माऊथ वॉशची बॉटल, डिटर्जेंटव क्लीनरची बॉटल करण्यासाठी याचा वापर केला जातो.

एलडीपीई म्हणजेच लॉ डेंसिटी पॉलीएथिलीन. खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी व औषधांच्या पॅकेजिंगसाठी याचा वापर केला जातो. हे प्लास्टिक फ्लेक्सिबल व पातळ असतं. यामध्ये गोष्टी स्टोर करणं सुरक्षित असतं.

पीपी म्हणजे प्रो-पॉलीप्रोपाइलीन. दहीसाठी कप, पाण्याची बॉटल, केचप बॉटल तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच मायक्रोवेव ओवनमध्ये जेवण गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱे कंटेनर तयार करण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो.

पीएस म्हणजे पॉलीस्टायर्न. डिस्पोपजेबल प्लास्टिक कप, प्लेट्स तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

1 ते 6 श्रेणीमध्ये समाविष्ट नसलेले प्लास्टिक कोड 7 मध्ये असते. त्यालाच पॉलीकार्बोनेट म्हटलं जातं. (एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.)