'या' ठिकाणी होणार स्वदेशी लसीची पहिली मानवी चाचणी; ५० स्वयंसेवकांना दिली जाणार लस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:49 PM2020-07-21T13:49:47+5:302020-07-21T14:46:07+5:30

कोरोनाच्या माहामारीत संपूर्ण जगभरातील लोक कोरोना विषाणूंच्या लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना व्हायरसची स्वदेशी लस कोवाक्सिनचे मानवी परिक्षण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ स्वयंसेवकांना कोवॅक्सिन दिली जाणार आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील १०० वॉलेंटीअर्सवर कोवॅक्सिनची चाचणी केली जाणार आहे. एम्समध्ये गुरुवारी कोवॅक्सनची चाचणी केली जाणार आहे. त्यातील ५० . त्यातील ५० लोकांवर लसीची चाचणी केली जाईल.

स्वदेशी लसीचे मानवी परिक्षण सुरू झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत या लसीचे मानवी परिक्षण हे प्रेरणादायी ठरले आहे. कोवॅक्सिनच्या चाचणीसाठी मोठ्या संख्येने वॉलेंटिअर्स उत्सुक होते. त्यातील ३७५ वॉलेटिअर्सना निवडण्यात आलं आहे.

दिल्लीतील एम्समध्ये १०० लोकांवर ही चाचणी होणार असून उरलेल्या २७५ लोकांवर देशातील वेगवगळ्या केंद्रांवर परिक्षण केले जाणार आहे.

एम्समधील ट्रायलसाठी १०० स्वयंसेवकांना निवडण्यात आलं आहे. सुरूवातील ५० लोकांना ही लस दिली जाणार आहे. या चाचणीत लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले तर डेटा मॉनिटरिंग कमिटी पाठवण्यात येणार आहे. या आठवड्यात गुरुवारी किंवा शुक्रवारी पहिल्या मानवी चाचणीसाठी लस दिली जाणार आहे.

एम्सचे अधिष्ठाता रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, या चाचणीत सहभाग घेण्यासाठी आधी मोठ्या संख्यत लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. पहिल्या टप्पयात १८ ते ५५ वयोगटातील निरोगी १०० वॉलेंटीअर्सना सहभागी करून घेतलं जाणार आहे.

त्यानंतरच्या टप्प्यात १२ ते ६५ वर्ष वयोगटातील लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इंस्‍टीट्यूट ऑफ वॉयरलॉजी (NIV) ने मिळून कोवॅक्सिन तयार केली आहे.

या लसीचे नाव BBV152 असेही आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीनंतर अमेरकेतील मॉडर्न इंक आणि भारतातील भारत बायोटेकची लसी शर्यतीत पुढे आहेत.