आयुष्य वाढवण्यासाठी रोज घरीच केवळ १५ मिनिटे करा 'हे' काम, मृत्यूचा १४ टक्के धोका होईल दूर....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:32 PM2021-02-09T15:32:11+5:302021-02-09T15:51:31+5:30

हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या(Harvard University) वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्ससोबत मिळून एक रिसर्च केला ज्यात हे सांगण्यात आलं आहे.

सर्वांनाच दीर्घायुष्य हवं असतं. पण प्रत्येकालाच वाटत असतं की, त्यांचं आयुष्य निरोगी(Healthy) रहावं. मात्र, अनेकांना वाटत असेल की, दीर्घायुष्य मिळवण्यासाठी खूप काही करावं लागेल. पण असं अजिबात नाहीय.

यासाठी तुम्हाला रोज केवळ १५ मिनिटे एक्सरसाइज करावी लागेल. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण जर तुम्ही रोज केवळ १५ मिनिटे एक्सरसाइज केली किंवा फिजिकल अॅक्टिविटी केली तर तुमचं आयुष्य ३ वर्षाने अधिक वाढतं. असा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.

हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या(Harvard University) वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन ऑफ रिटायर्ड पर्सन्ससोबत मिळून एक रिसर्च केला ज्यात हे सांगण्यात आलं आहे.

रिसर्चनुसार, रोज केवळ १५ मिनिटांच्या फिजिकल अॅक्टिविटीमुळे आयुष्य ३ वर्षाने वाढतं. याचं कारण हे आहे की, रोज १५ मिनिटे एक्सरसाइज केल्याने तुमचं हृदय हेल्दी राहतं.

या रिसर्चमध्ये सहभागी लोकांवर ८ वर्षांपर्यंत नजर ठेवण्यात आली होती. ज्यानंतर निष्कर्ष समोर आला की रोज केवळ १५ मिनिटे एक्सरसाइज केली तर मृत्यूचा धोका १४ टक्के कमी होतो आणि व्यक्तीचं वयही ३ वर्षाने वाढतं.

हार्वर्डचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. डेनिअल फॉर्मेन सांगतात की, 'एक्सरसाइज तशी तर अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

पण याने खासकरून शरीरात इन्फ्लेमेशनला (Inflammation) ला कमी करण्यात मदत होते. ज्याने हृदय(Heart) आणि धमण्यांचं (Artery) आरोग्य प्रभावित होतं.

सोबतच रोज एक्सरसाइज केल्याने शरीरात तयार होणारे ऑक्सिडेटीव स्ट्रेससोबत लढण्याची आणि त्यांना कमी करण्याची शरीराची क्षमताही चांगली होते. ऑक्सिडेटीव स्ट्रेस कोशिकांना नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो'.

डॉ. फॉर्मेन सांगतात की, 'हे गरजेचं नाही की, रोज तुम्ही जिममध्ये जाऊनच कठोर आणि खूप मेहनतीची एक्सरसाइज करावी. कमी तीव्रता असलेली एक्सरसाइज (Low Intensity Exercise) ही अनेक दृष्टीने फायदेशीर होऊ शकते'.

तुम्ही हवं तर रोज एरोबिक्स (Aerobics) करू शकता किंवा सिंपल स्ट्रेंचिगही फायदेशीर ठरू शकतं. गरजेचं हे आहे की, तुम्ही एक्सरसाइजचा कंटाळा न करता याला फिजिकल अॅक्टिविटी मानून रोज आवर्जून करा.