CoronaVirus : तुमच्या घरातील 'या' गोष्टीवर असू शकतो कोरोना व्हायरस, वेळीच व्हा सावध नाहीतर....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:44 PM2020-04-10T17:44:22+5:302020-04-10T17:58:25+5:30

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना कोरोनाच्या जाळ्याच अडकण्यापासून वाचवता यावं यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असलं तरी वैयक्तीक पातळीवर स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला घरातील कोणत्या वस्तूंमुळे कोरोनाची लागण होऊ शकते यामुळे सांगणार आहोत.

उशी-जर तुम्ही बाहेर गेल्यानंतर एखादी व्यक्ती शिंकत किंवा खोकत असेल आणि तुमच्या केसांशी त्या व्यक्तीचा संपर्क आल्यानंतर समस्या निर्माण होऊ शकते. कारण तुम्ही रोज केस धुत नसाल तर ते बॅक्टेरिया तुमच्या अंथरूणाला चिकटून राहू शकतात. त्यासाठी बाहेर पडत असाताना केसांना टोपी किंवा स्कार्फने झाका.

ग्लोव्हज- किचनमधील साफ-सफाई करत असताना तुम्ही ग्लोव्हजचा वापर करत असता. त्याच हातांनी त्वचेवर इतर ठिकाणी स्पर्श करता त्यामुळे इन्फेक्शन पसरू शकतं. म्हणून ग्लोव्हजचा वापर करून झाल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ करा. ग्लोव्हज घातलेले असताना हात तोंडाला लावू नका.

पायपुसणी- बाहेरून घरात येताना पायपुसणीला पाय पुसत असाल तर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं कारण ठरू शकत. घरातील बेडशिट, पायपुसणी संक्रमित व्यक्तीच्याच स्पर्शाने दुषित होऊ शकतात. त्यासाठी बारकाईने घरातील प्रत्येक वापराच्या कपड्यांची स्वच्छता करा.

कपडे- स्वतःचे कपडे रोजच्या रोज स्वच्छ करा. कारण एखाद्या शिंकलेल्या किंवा खोकलल्या व्यक्तीचे ड्रॉपलेट्स तुमच्या कपड्यांवर असू शकतात. त्यासाठी काही दिवस घराबाहेर पडणं पूर्णपणे टाळा. कारण कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.

टॉवेल रुमाल- तुम्ही जेव्हा बाहेरून घरात प्रवेश करता. त्यावेळी हात-पाय पुसण्याासाठी टॉवेलचा वापर करता. हाच टॉवेल कोरोना पसरण्याचं कारण सुद्धा ठरू शकतो. त्यासाठी बाहेरून आल्यानंतर आधी स्वच्छ अंघोळ करा. शक्यतो रोज धुवत असलेल्या टॉवेलचा वापर करा. सतत कित्येक दिवस एकाच टॉवेलचा वापर केलात तर व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संक्रमणाचा धोका असू शकतो.

रिमोट- टिव्हीच्या रिमोटला दिवसभरातून अनेक व्यक्ती हात लावत असतात. त्यासाठी कधीही रिमोटला हात लावताना सॅनिटाईज करून घ्या.

मोबाईल चोवीस तास हातात ठेवत असाल तर काहीही खाण्या अथवा पिण्याआधी हात स्वच्छ धुवा. तसंच दिवसातून ४ ते ५ वेळा मोबाईला सॅनिटायजरने स्वच्छ करा.