CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी संशोधकांची 'वेगळीच' शक्कल; लस येईपर्यंत होणार संरक्षण

By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 02:40 PM2020-10-14T14:40:29+5:302020-10-14T14:46:02+5:30

देशातील कोरोना रुग्णांचा ७२ लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरीही धोका कायम आहे.

कोरोना लस येण्यासाठी नवं वर्ष उजाडेल. तसे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले. त्यानंतरही संपूर्ण देशात लसीकरण करण्यास बराच कालावधी लागेल.

कोरोना लस येण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्यानं भारतीय कंपन्यांनी वेगळीच शल्लक लढवली आहे.

देशातल्या तीन कंपन्यांनी कोविड-१९ च्या अँटीबॉडी औषधांवर काम सुरू केलं आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतील.

भारत सीरम्स, इन्टास फार्मा आणि बायोलॉजिकल ई या कंपन्यांनी भारतीय वैद्यकीय संधोधन परिषदेच्या मदतीनं अँटीबॉडीज तयार करू शकणाऱ्या औषधांवर काम सुरू केलं आहे.

अँटीबॉडीज शरीरात फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सप्रमाणे काम करतात. शरीरावर विषाणूचा हल्ला होताच रोगप्रतिकार यंत्रणा एँटीबॉडीज तयार करू लागते.

सध्या कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रुग्णांच्या शरीरातील व्हायरलचं प्रमाण कमी करतात. तर एँटीबॉडीज लसीप्रमाणे काम करतात.

अँटीबॉडीजमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे विषाणूपासून बचाव होतो.

अहमदाबादमधल्या इन्टास कंपनीनं कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींच्या शरीरातल्या रक्तामधल्या अँटीबॉडीज काढण्याची योजना तयार केली आहे. यापासून सर्व रक्तगटातल्या व्यक्तींना देता येईल, असं औषधं तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

भारत सीरम घोड्यांच्या अँटीसेराचा वापर करून अँटीबॉडीज तयार करणार आहे. या औषधाच्या चाचणीचा अहवाल पुढील महिन्यात येतील, अशी अपेक्षा सीरमला आहे.