Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:15 PM2021-04-29T17:15:47+5:302021-04-29T17:30:26+5:30

लस घेतल्यानंतर अनेक लोकांना लस घेतलेल्या हातात रेड रॅशेसदेखील येतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की यात घाबरण्यासारखे काहीच नाही. (Corona vaccine )

कोरोना व्हायरसपासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लस घेणे हाच आहे. मात्र, काही लोक याच्या संभाव्य साइड इफेक्टला घाबरत आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की लशीच्या साइड इफेक्ट्सना घाबरण्याची गरज नाही. खरे तर हे साइड इफेक्ट, आपल्या शरीरात लस काम करत आहेत, हे सांगतात. (coronavirus this is the sign your Corona vaccine is working)

अमेरिकेचे महामारी तज्ज्ञ आणि चीफ मेडिकल अॅडव्हायझर एंथॉनी फाउची यांनी अमेरिकन न्यूज चॅनल MSNBC ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे, की 'हातात दिली जाणारी लस टप्प्या-टप्प्याने प्रतिक्रिया देते. कधी-कधी दुसऱ्या डोसनंतर थोडासा त्रास होतो आणि थंडी वाजते. याचा अर्थ आता आपली इम्यून सिस्टिम वेगाने काम करू लागली आहे.'

व्हॅक्सीन इम्यून सिस्टमला COVID-19 स्पाइक प्रोटीन ओळण्यात आणि त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करण्यात मदत करते. अँटीबॉडीमुळे खराब झाल्यानंतर हा प्रोटीन व्हायरस वेगाने वाढण्यापासून आणि आजार पसरविण्यापासून रोखतो. या प्रक्रियेत काही लोकांना साइडइफेक्ट जाणवू शकतो.

CDC नुसार, कोरोना लशीचे सर्वसामान्य साइड इफेक्ट म्हणजे, इंजेक्शनच्या जागी लाल होणे, त्या ठिकाणी त्रास आणि सूज येणे. थकवा, डोकेदुखी, स्नायू दुखणे, ताप, थंडी वाजणे आणि मळमळणे, तसेच काहीच साइड इफेक्ट जाणवले नाही, तर लस प्रभावी नाही, असा अर्थ होत नाही.

फाउची यांनी सांगितले, की लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांनाही थकवा, अंग दुखी, थंडीचा त्रास जाणवला. मात्र, एका दिवसानंतर ही लक्षणं संपली.

फाउची म्हणाले, काही लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक साइड इफेक्ट्स जाणवतात. कारण, पहिल्या डोसनंतर इम्यून सिस्टिमने व्हायरसची ओळख केलेली असते. आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर तो त्यावर अत्यंत वेगाने काम करतो. यामुळे शरीराचे तापमाण वाढते आणि ताप, थकवा अथवा त्रास होतो.

लस घेतल्यानंतर अनेक लोकांना लस घेतलेल्या हातात रेड रॅशेसदेखील येतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की यात घाबरण्यासारखे काहीच नाही. प्रत्यक्षात लस योग्य दिशेने काम करत आहे. याचे हे संकेत आहेत. यावरून आपल्याला एक चांगली इम्यूनसिस्टिम मिळत असल्याचे समजते. याचा अर्थ असा, की आपल्याला लस दिली असल्याची ओळख इम्यून सिस्टम करत आहे.

लस घेतल्यानंतर आपल्याला ताप आणि थकवा यांसारखे साइड इफेक्ट्स जाणवत असतील, तर अशा स्थितीत CDC खूप सारे द्रव पदार्थ घेण्याचा आणि विश्रांतीचा सल्ला देते. लस घेतलेल्या हाताला सूज आली असेल तर त्या ठिकाणी थंडी पट्टिने शेका...

Read in English