CoronaVirus: आनंदाची बातमी! लसीनंतर कोरोनावरील टॅब्लेटही तयार; रुग्णालयात भर्ती होण्याचा, मृत्यूचा धोका 90% कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:14 PM2021-11-05T21:14:14+5:302021-11-05T21:24:06+5:30

सध्या यूएसमध्ये, कोरोनावरील उपचारात इंजेक्शनद्वारे औषध दिले जाते. यापूर्वी, फार्मास्युटिकल कंपनी मर्ककडून COVID-19 गोळीला मंजुरी देण्यात आली आहे. गोळीला मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे.

फार्मास्युटिकल कंपनी Pfizer Inc. ने शुक्रवारी म्हटले आहे, की त्याची प्रायोगिक अँटीव्हायरल गोळी, रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका 90 टक्क्यांपर्यंत कमी करते. याच बरोबर, आता ही कंपनी यूएस मार्केटमध्ये कोरोना विरोधात सहज वापरले जाणारे पहिले औषध आणण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे.

सध्या यूएसमध्ये, कोरोनावरील उपचारात इंजेक्शनद्वारे औषध दिले जाते. यापूर्वी, फार्मास्युटिकल कंपनी मर्ककडून COVID-19 गोळीला मंजुरी देण्यात आली आहे. गोळीला मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे.

Pfizer ने म्हटले आहे, की स्वतंत्र तज्ज्ञांद्वारे औषधाच्या परिणामांच्या क्षमतेच्या आधारे, कंपनीने अध्ययन थांबविण्याची शिफारस केल्यानंतर, ते एफडीए आणि आंतरराष्ट्रीय नियामकांकडे लवकरात लवकर या गोळीला अधिकृत करण्यात यावे, अशी विनंती करतील.

एकदा Pfizer ने अर्ज केल्यानंतर, FDA आठवड्यांत किंवा महिनाभरात निर्णय घेऊ शकते.

जगभरातील संशोधक कोरोना विरोधातील उपचारात गोळी विकसित करण्यावर काम करत आहेत. अशी गोळी जी लक्षणे कमी करण्याबरोबरच, लवकर बरे करण्यासाठी आणि रुग्णालये आणि डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी घरीही घेतली जाऊ शकेल.

फायझरने शुक्रवारी 775 प्रौढांवर केलेल्या अभ्यासाचे प्राथमिक निकाल जाहीर केले. कंपनीचे औषध दुसर्‍या अँटीव्हायरलसह घेणार्‍या रूग्णांच्या रुग्णालयात भरती होणे अथवा एक महिन्यानंतर, संयुक्त मृत्यू दरात एक डमी गोळी घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत 89 टक्क्यांची घट होती.

औषध घेणार्‍या रुग्णांपैकी एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी रूग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती आणि कुणाचाही मृत्यू झाला नाही. तुलना गटात 7 टक्के रुग्णालयांत दाखल झाले आणि 7 मृत्यू झाले.

"आम्हाला आशा होती, की आमच्याकडे काहीतरी विलक्षण आहे, परंतु असे दुर्मिळ आहे की, उत्कृष्ट औषध जवळपास 90 टक्के प्रभावी आणि मृत्यूच्या बाबतीत 100 टक्के सुरक्षिततेसोबत येते.''

सौम्य ते मध्यम स्वरुपाचा कोरोना असलेल्या अभ्यासातील सहभागींचे लसीकरण केले गेले नाही आणि लठ्ठपणा, मधुमेह अथवा हृदयरोगासारख्या आरोग्य समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा अधिक धोका असल्याचे मानले जात होते. सुरुवातीच्या लक्षणांच्या 3 ते 5 दिवसांत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला आणि 5 दिवसांपर्यंत चालला.

फाइझरने 'साइड इफेक्ट' (गोळी घेतल्यानंतर होणारा त्रास) काही काही तपशील दिला. मात्र, म्हटले आहे, की 20 टक्के गटांमध्ये समस्यांचे प्रमाण सारखेच होते.

Read in English