'अशा' पद्धतीने झोपल्यास कोरोनाचा विषाणूंचा टळेल धोका; हृदय रोग तज्ज्ञांचा प्रभावी सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:07 PM2020-06-10T12:07:55+5:302020-06-10T12:29:31+5:30

जगभरात कोरोनाची माहामारी अजूनही आटोक्यात येत नाही. या आजारात मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप कोणतीही लस किंवा औषध कोरोनाच्या उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे.

वेगवेगळ्या देशात कोरोना रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर के.के अग्रवाल यांनी कोरोनापासून बचावासाठी लोकांना एक सोपा सल्ला दिला आहे. ओन्ली माय हेल्थ या बेवपोर्टलची बोलताना डॉक्टर के.के अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोटावर झोपल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पोटावर झोपल्याने फुफ्फुसं पूर्णपणे उघडली जातात. पाठीवर झोपल्यामुळे फुफ्फुस बंदच राहतात. अशा स्थितीत तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर कोरोनामुळे फुफ्फुसांचे पोस्टिरियर पोर्शन बिघडण्याची शक्यता असते.

जर तुम्ही पोटावर झोपण्याऐवजी पाठीवर झोपत असाल तर त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार नाही.

पोटावर झोपण्याच्या स्थितीला पोर्निंग असं म्हणतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही पोटावर सतत झोपू शकत नसाल तर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. पोटावर झोपत असाल तर सतत घोरण्याची समस्या उद्भवू शकते.

पोटावर झोपण्याच्या स्थितीला प्रोनिंग असं म्हणतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही पोटावर सतत झोपू शकत नसाल तर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. पोटावर झोपत असाल तर सतत घोरण्याची समस्या उद्भवू शकते.

कोरोनापासून बचावासाचे अन्य उपाय : सतत हात धुवा, बाहेर जाताना मास्कचा वापर करा, लोकांच्या संपर्कात आल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचं पालन करास घरातील लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना घराबाहरे जाऊ देऊ नका.