अरे देवा! आता फुफ्फुसांसह मेंदूतसुद्धा घर तयार करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून खुलासा

By manali.bagul | Published: January 28, 2021 03:58 PM2021-01-28T15:58:34+5:302021-01-28T16:16:46+5:30

कोरोना व्हायरस आपल्या डोक्यात घर तयार करू शकतो असा दावा जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोकोना कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरे होऊन घरी जात आहेत. त्यांना अचानक मृत्यूचा सामना करावा लागत आहे किंवा गंभीर स्वरूपातील आजारपणांना तोंड द्यावे लागत आहे. जॉर्जिया युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना व्हायरस फक्त शरीरावर आक्रमण करत नाही तर मेंदूत घरसुद्धा तयार करतो. कोरोना व्हायरस डोक्यात घर करून बसलेला असतो. शास्त्रज्ञांनी याबाबत परिक्षण करण्यासाठी उंदरांना संक्रमित केलं होतं.

कोरोना संक्रमित उंदरांच्या मेंदूवर अभ्यास केल्यानंतर दिसून आलं की, कोरोना व्हायरस मेंदूत घर करून बसला आहे. त्यामुळे गंभीर मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे इतर अवयवांच्या तुलनेत मेंदूत असलेल्या कोरोना व्हायरसचे प्रमाण १००० पट जास्त होते. हे खूप जीवघेणं ठरू शकतं.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील हा अभ्सास व्हायसेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांनी दिसून आलं की कोरोना संक्रमणाच्या पाच ते सहा दिवसांनंतर व्हायरस उंदरांमध्ये लपलेला दिसून आला होता. त्यानंतर फुफ्फुसांमध्ये या व्हायरस प्रमाण कमी झालं होतं.

वैज्ञानिकांना दिसून आलं की कोरोना संक्रमणाच्या पाच ते सहा दिवसांनंतर व्हायरस उंदरांच्या मेंदूत लपला होता. त्यानंतर फुफ्फुसांमध्ये या व्हायरसचं प्रमाण कमी झालं होतं.

या संशोधनाचे मुख्य संशोधक साहाय्यक प्राध्यापक मुकेश कुमार यांनी सांगितले की, डोकं एक अशी जागा आगे ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस लपणं पसंत करेल. कारण तो एकच असा भाग आहे. ज्याबाबत माणसांना जास्त कल्पना नाही.

कोरोना संक्रमणानंतर वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. वास न जाणवणं, चव जाणं या लक्षणांचा संबंध फुफ्फुसांशी नसून मेंदूशी आहे.

व्हायरस इन्फेक्शनचा परिणाम जेव्हा हृदयावर होत असतो. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सुज येणं, वेदना होतात.

या संशोधनानंतर कोरोना व्हायरस फक्त फुफ्फुसांमध्ये पसरतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण कोरोनाचा मेंदूवरही परिणाम होतो. एकदा मेंदूवर परिणाम झाल्यानंतर संपूर्ण शरीरातील कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो.