Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर लगेच करू नका घाई, शारीरिक संबंध पडू शकतात महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:57 PM2020-05-16T15:57:13+5:302020-05-16T16:12:33+5:30

हेल्थ एक्सपर्ट्स सांगत आहेत की, जर कुणात कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी शारीरिक संबंध टाळावे.

कोरोना संक्रमित पुरूषांच्या स्पर्ममध्ये व्हायरस मिळाल्यानंतर लोकांना शारीरिक संबंधाबाबत सतर्कता बाळगण्यास सांगण्यात येत आहे. हेल्थ एक्सपर्ट्स सांगत आहेत की, जर कुणात कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी शारीरिक संबंध टाळावे. तेच एका एक्सपर्टचं मत आहे की, कोरोनातून बरे झाल्यावरही काही दिवस शारीरिक संबंध ठेवू नका.

थायलंडच्या डिजीज कंट्रोल डिपार्टमेंटचे सीनिअर मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, कोरोना आजारातून ठिक झाल्यावर काही लोकांनी पुढील काही दिवस शारीरिक संबंध पूर्णपणे टाळावे.

चीनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये इशारा देण्यात आला होता की, स्पर्ममध्ये कोरोना व्हायरस असू शकतात. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांच्या स्पर्ममध्येही व्हायरस मिळाले होते.

थायलंडचे एक्सपर्ट वीरावत मनोसुट्टी यांचं असं मत आहे की, कोरोनातून बरे झाल्यावर काही दिवसांपर्यंत किस करणे टाळले पाहिजे. साधारण 30 दिवसांपर्यंत किस आणि शारीरिक संबंध कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी टाळावे.

दरम्यान कोरोनातून बरे झालेले काही लोक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सीनिअर मेडिकल एक्सपर्ट यांनी हेही सांगितले की, जर 30 दिवसानंतर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत असाल कंडोमचा वापर नक्की करा.

चीनमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 33 रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील 15 हॉस्पिटलमध्ये होते तर 23 कोरोनातून बरे झालेले होते.

रिसर्चमध्ये जेव्हा सॅम्पलची तपासणी केली गेली तेव्हा यातील एकूण 6 लोकांच्या स्पर्ममध्ये कोरोना व्हायरस मिळाले. कोरोनातून ठीक झालेल्या दोन लोकांच्या स्पर्ममध्येही व्हायरस असल्याचं आढळून आलंय.

वैज्ञानिक सांगतात की, ठीक झाल्यानंतर व्हायरस काही दिवसांपर्यंत शरीरात राहू शकतो आणि शारीरिक संबंधाच्या माध्यमातून संक्रमण पसरू शकतं.

JAMA नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये अभ्यासक शिजी झांग म्हणाले की, शक्यता आहे की ठीक झालेले रूग्णही दुसऱ्यांमध्ये व्हायरस पसरवू शकतात.

दरम्यान, अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये दिसून आलं की ज्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी असतो. अशा रुग्णांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. हा रिसर्च जर्मनीतील University Medical Center Hamburg-Eppendorf च्या संशोधकांकडून करण्यात आला होता. टेस्टोस्टेरॉन हा शारीरिक संबंधाशी निगडीत हार्मोन आहे.

Read in English