CoronaVirus News : हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करता?; वेळीच व्हा सावध, आरोग्य मंत्रालयाने दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 08:26 AM2020-07-27T08:26:26+5:302020-07-27T08:40:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जनजागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाखांच्याही पुढे गेली आहे. नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल 14 लाख 11 हजार 954 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

covid19india.orgच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 4 लाख 77 हजार 228 सक्रिय रुग्ण आहेत. 9 लाख 1 हजार 959 जणांना रुग्णालयातून जिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 32 हजार 350 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईन, होम आयसोलेशच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जनजागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत.

हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करत असाल तर ते धोकादायक ठरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयानेच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हँड सॅनिटायझर वारंवार वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असं याआधी अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेही याबाबत लोकांना सावध केलं आहे.

हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा यांनी माहिती दिली आहे.

"एखाद्या व्हायरसचा इतका प्रकोप होईल याचा कोणीही विचारही केला नव्हता. स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका" असं वर्मा यांनी म्हटलं आहे.

सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. साबण आणि पाणी असेल तर त्यानेच हात धुवा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सॅनिटायझर घेताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगल्या आणि प्रभावी हँड सॅनिटायझरमध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहल असणं गरजेचं आहे. त्वचेला इजा होईल असं कोणतंही केमिकल नसावं.

हँड सॅनिटायझरमध्ये 60 ते 95 टक्के अल्कोहोल असल्यानं हँड सॅनिटायझर प्रभावी असतात. तेव्हाच ते जंतू आणि कोरोनासारख्या व्हायरसचा नाश करू शकतात.

व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना त्यात कोणते घटक आहे हे एकदा नक्की तपासा.

व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना त्यात कोणते घटक आहे हे एकदा नक्की तपासा.

Read in English