Coronavirus : भारतीय वैज्ञानिकांचा चिंता वाढवणारा दावा, मॉन्सूनमध्ये 'या' कारणाने आणखी वाढू शकतो कोरोनाचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:27 PM2020-06-12T13:27:05+5:302020-06-12T13:58:34+5:30

खोकल्यावर बाहेर आलेल्या कणांवर रिसर्च - आयआयटी मुंबईतील रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवालसहीत त्यांच्या सहकाऱ्यांनी हा रिसर्च केला.

कोरोना व्हायरस आणि तापमानाबाबत गेल्या तीन महिन्यात वेगवेगळे रिसर्च समोर आलेत. अनेक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोनावर गरमीचा म्हणजेच उष्णतेचा काहीही परीणाम होत नाही. तर काही लोकांनी हा दावा केला की, जास्त उष्णतेत कोरोना व्हायरस कमजोर पडतो.

नुकताच मुंबईतील वैज्ञानिकांनी केलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, उष्ण आणि कोरड्या वातावरणात सरफेसवर कोरोना व्हायरसची सक्रिय राहण्याची शक्यता कमी होते. या माहितीच्या आधारे जगभरातील सार्वजनिक ठिकाणांना संक्रमण मुक्त करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जाऊ शकतात.

वैज्ञानिकांनी एका कॉम्प्युटर मॉडेलचा वापर करून हा रिसर्च केला. फिजिक्स ऑफ फ्लूड्स जर्नलमध्ये प्रकाशित विश्लेषण करण्यात आलं की, जेव्हा कोविड-19 खोकतो किंवा शिंकतो तेव्हा संक्रमणासाठी कोरोना व्हायरस, सार्स-कोविड-2 किती वेळ अनुकूल स्थितीत राहतो.

खोकल्यावर बाहेर आलेल्या कणांवर रिसर्च - आयआयटी मुंबईतील रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवालसहीत त्यांच्या सहकाऱ्यांनी हा रिसर्च केला. त्यांनी न्यूयॉर्क आणि सिंगापूरसहीत जगातल्या जवळपास सहा शहरातील संक्रमित रूग्णांच्या खोकण्यातून आणि शिंकण्यातून निघणाऱ्या कणांचा अभ्यास केला. हे कण वेगवेगळ्या सरफेसवर किती वेळात सूकतात याचा अभ्यास केला.

रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, मनुष्याच्या डोक्याच्या एका केसाच्या जाडीच्या आकाराचे हे कण कोविड-19 च्या रूग्णांचे खोकताना, शिंकताना आणि इतकेच काय तर बोलतानाही बाहेर निघतात.

व्हायरसला बाहेर घेऊन येणाऱ्या या कणांचं बाष्पिभवन होतं तेव्हा शिल्लक राहिलेला व्हायरस निष्क्रिय होतो. याप्रमाणे कोविड-19 च्या सक्रिय राहण्याचा कालावधी आणि त्याचा संचार थेट प्रभावित होतो.

'या' वातावरणात व्हायरस सक्रिय होण्याची शक्यता अधिक वाढते - वैज्ञानिकांनी विश्लेषणाच्या आधारावर सांगितले की, कोविड-19 च्या वाढीचा थोडाफार संबंध बाहेरील वातावरणाशीही असतो. कोरड्या वातावरणाच्या तुलनेत आर्दता असलेल्या वातावरणात व्हायरस सक्रिय राहण्याची शक्यता पाच पटीने वाढते. (Image Credit : moneycontrol.com)

वैज्ञानिक म्हणाले की, जास्त ओलावा असलेल्या स्थानांवर छोटे कण जास्त वेळापर्यंत सक्रिय होते. याने व्हायरस अधिक वेळेपर्यंत सक्रिय राहण्याची माहिती मिळते. ते म्हणाले की, गरम आणि शुष्क स्थानांमध्ये सरफेसवर हे कण लवकर निष्क्रिय होतात. (Image Credit : medium.com)

दरम्यान देशात पहिल्यांदाच चोवीस तासात कोरोनाच्या रूग्णांची नव्य रूग्णांची संख्या 10 हजाराच्यावर गेलीये. तर लागण झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 2, 97, 535 झाली आहे. तर मृतांचा आकडा 8, 498 वर गेलाय. अशातच भारत आता कोरोनाच्या केसेसबाबत भारत आता ब्रिटनला मागे सोडून जगाताल चौथा सर्वात जास्त प्रभावित देश बनलाय. (Image Credit : bloombergquint.com)

Read in English