खुलासा! केवळ फुप्फुसांवरच नाही तर मेंदूवरही हल्ला करतो कोरोना व्हायरस, बोलण्याची क्षमताही गमावतात रूग्ण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 11:45 AM2020-04-04T11:45:38+5:302020-04-04T12:07:02+5:30

रूग्णाने बोलण्याची क्षमता गमावली - nytimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरस हा मेंदूला कशाप्रकारे प्रभावित करत आहे.

कोरोना व्हायरस हा व्यक्तीचा गळा आणि नंतर फुप्फुसांना प्रभावित करतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण आता हा व्हायरस मेंदूही निकामी करतो असा दावा जगभरातील न्यूरॉलॉजिस्ट यांनी केला आहे. त्यांच्यानुसार कोरोनाने पीडित रूग्णांचा एक गट असाही आहे ज्यांच्या मेंदूवर व्हायरसच्या संक्रमणाचा प्रभाव दिसतोय. एक्सपर्ट्सनी याला ब्रेन डिसफंक्सन असं नाव दिलं आहे. संक्रमणाचा प्रभाव काही रूग्णांच्या बोलण्याच्या क्षमतेवरही पडत आहे आणि मेंदूवर सूज आल्याने डोकेदुखीही वाढत आहे. अशा अनेक दुर्मीळ केसेस समोर येत आहेत. तसेच काही लोकांची गंध घेण्याची आणि वेगवेगळ्या टेस्ट ओळखण्याची क्षमताही घटत आहे.

रूग्णाने बोलण्याची क्षमता गमावली - nytimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरस हा मेंदूला कशाप्रकारे प्रभावित करत आहे. हे मार्चमध्ये समोर आलेल्या एक केस द्वारे समजून घेता येईल. 74 वर्षांच्या एका कोरोना पीडिताला इमरजन्सीमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्याला खोकला आणि ताप होता. पण रिपोर्टमधून निमोनिया असल्याचं समोर आलं आणि त्याला घरी पाठवण्यात आलं. (https://www.nytimes.com/2020/04/01/health/coronavirus-stroke-seizures-confusion.html या लिंकवर तुम्ही रिसर्च वाचू शकता)

दुसऱ्या दिवशी त्याला ताप वाढला आणि पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. आता त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची स्थिती इतकी वाईट होती की, तो डॉक्टरला त्याचं नावही सांगू शकत नव्हता. त्याने बोलण्याची क्षमता गमावली होती.

या रूग्णाला फुप्फुसाशी संबंधित आजार होता. त्यासोबतच तो पार्किंसनसोबतही लढत होता. ज्यामुळे त्याला हात आणि पाय हलवण्यातही अडचण येत होती. तसेच त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोकाही बघायला मिळाला. डॉक्टरांना आधी शंका आली की, याला कोरोनाचं संक्रमण झालंय आणि नंतर तेच समोर आलं.

दुसरी केस - मेंदूवर सूज - एक वेगळी केस मिशिनगनच्या डेट्रॉइटमध्ये समोर आली. साधारण 50 वर्षांच्या एका एअरलाइन कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली. तिला काहीच कळत नव्हतं. तिने डॉक्टरांना डोकं दुखत असल्याची समस्या सांगितली. मोठ्या मुश्कीलीने ती डॉक्टरांना तिचं नाव सांगू शकली. हळूहळू तिचा उत्तर देण्याचा वेग कमी झाला. जेव्हा ब्रेन स्क्रॅनिगं केलं गेलं तेव्हा समोर आलं की, तिच्या मेंदूच्या अनेक भागांवर सूज आहे. तर मेंदूच्या काही कोशिका डॅमेज होऊ नष्ट झाल्या आहेत.

डॉक्टरांनी सांगितले की, ही मेंदूची गंभीर स्थिती आहे आणि याला त्यांनी एक्यूट नेक्रोटायजिंग एनसेफेलॉपॅथी असं नाव दिलं. ही फारच दुर्मीळ समस्या आहे जी इंफ्लूएंजा आणि दुसऱ्या व्हायरसच्या संक्रमणाने होते. हेनरी फोर्ड हेल्थ सिस्टमचे न्यूरोरॉजिस्ट डॉ. एजिसा फोरे यांच्यानुसार, संक्रमणानंतर काही दिवसात मेंदूवर सूज येते आणि सूज कायम राहतं.

मेंदूत रक्ताच्या गाठी आणि झटक्यासारखी लक्षणे - इटलीच्या ब्रेसिका युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलशी संबंधित डॉ. एलेसेंड्रो पेडोवानी यांच्यानुसार, कोरोनाच्या रूग्णांमधील असा बदल इटली आणि जगभरातील डॉक्टरांनी नोटिस केला. यात ब्रेन स्ट्रोक, अटॅक, एनसेफेलायटिसची लक्षणे, मेंदूत रक्ताच्या गाठी, सून्न होणे अशा स्थिती दिसल्या. काही केसेसमध्ये रूग्णात ताप, श्वास घेण्याची समस्येसोबतच बेशुद्ध होण्याचीही समस्या होती. इटलीत अशा रूग्णांसाठी न्यूरो-कोविड यूनिट सुरू केलं होतं.

फुप्फुसांसाठी व्हेंटिलेटर, मेंदूसाठी काहीच नाही - पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शैरी चोउ यांच्यानुसार, याबाबत लवकर नवीन माहिती समोर आणण्याची गरज आहे. कारण फुप्फुसं डॅमेज झाली तर व्हेंटिलेटरने रूग्णाची रिकव्हरीची आशा आहे. पण मेंदूसाठी काहीच सुविधा नाही.

चीनच्या वैज्ञानिकांनीही मान्य केलं - रिसर्चमध्ये चीनच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, असे अनेक पुरावे मिळाले आहेत जे सांगतात की, कोरोना व्हायरस केवळ श्वासनलिकेपर्यंत मर्यादित नाही. तो नर्वस सिस्टीमपर्यंत पोहोचत आहे. जो श्वास घेण्याची क्षमता नष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. चीनमध्ये झालेल्या दुसऱ्या एका रिसर्चमध्येही हे स्पष्ट झालं आहे. या रिसर्चनुसार कोरोनाने पीडित 15 टक्के गंभीर रूग्णांच्या मानसिक आरोग्य बदल झाला आहे.