Coronavirus : रूग्णांच्या हृदयावर कसा हल्ला करतो कोरोना? आधीपेक्षा ५० टक्के जास्त घातक....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:43 AM2021-05-04T09:43:09+5:302021-05-04T09:54:44+5:30

Coronavirus : डॉ. सेठ पुढे म्हणाले की, 'दुर्दैवाने हा व्हायरस माणसाच्या हृदयालाही नुकसान पोहोचवत आहे. याने हृदयात क्लॉटिंगची समस्या वाढू शकते.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही तरूणांसाठी अधिक घातक ठरत आहे. अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात संक्रमित लोकांमध्ये कार्डियाक अरेस्ट आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या बघायला मिळाली. ऑक्सीजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे स्थिती गंभीर झाली आहे. यावर मेडिकल एक्सपर्टनी सविस्तर चर्चा केली.

फॉर्टिस हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अशोक सेठ यांनी आजतकसोबत बोलताना सांगितले की, 'म्यूटेंट व्हायरस गेल्यावेळच्या तुलनेत ५० टक्के जास्त संक्रामक झाला आहे. दुसरी बाब म्हणजे जास्तीत जास्त तरूण नोकरी किंवा एखाद्या कामासाठी बाहेर पडत आहेत. यामुळे त्यांना संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे संक्रमित तरूणांची संख्या वाढत आहे'.

डॉ. सेठ पुढे म्हणाले की, 'दुर्दैवाने हा व्हायरस माणसाच्या हृदयालाही नुकसान पोहोचवत आहे. याने हृदयात क्लॉटिंगची समस्या वाढू शकते. म्हणजे हृदयात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. या रक्ताच्या गाठी फुप्फुसं आणि धमण्यांमध्येही जमा होऊ शकतात. असं झाल्याने रूग्णाला हार्ट अटॅकची शक्यता अधिक वाढते'.

ते म्हणाले की, 'कोरोनामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर पडतात. हृदयात इन्फ्लेमेशन वाढल्याने असं होतं. याने हार्ट अटॅक, ब्लड प्रेशरमध्ये समस्या आणि हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी होऊ लागतात. फुप्फुसात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशा समस्या तरूणांमध्ये बघायला मिळत आहेत.

डॉ. सेठ यांनी सांगितले की, कोरोना झाल्यावर पाचव्या दिवशी क्लॉटिंग होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हे शरीरात एक इन्फ्लेमेटरी रिअॅक्शन असतं. याने रूग्णाला आधी काही हलकी लक्षणे दिसतात जसे की, खोकला किंवा ताप. हा व्हायरसचा थेट प्रभाव नाही तर एक इन्फ्लेमेटरी आणि इम्यूडॉ. सेठ यांनी सांगितले की, कोरोना झाल्यावर पाचव्या दिवशी क्लॉटिंग होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हे शरीरात एक इन्फ्लेमेटरी रिअॅक्शन असतं. याने रूग्णाला आधी काही हलकी लक्षणे दिसतात जसे की, खोकला किंवा ताप. हा व्हायरसचा थेट प्रभाव नाही तर एक इन्फ्लेमेटरी आणि इम्यूनोलॉजिकल रिअॅक्शन आहे.नोलॉजिकल रिअॅक्शन आहे.

ते म्हणाले की, 'सातव्या दिवशी शरीरात व्हायरसचं रेप्लीकेशन नष्ट होणं सुरू होतं. मात्र, या दरम्यान बॉडीचा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सही सुरू होतो. त्यामुळे पहिले चार दिवस जास्त चिंतेची बाब नसते. पण ५ ते १२ दिवसादरम्यान स्थिती गंभीर राहते. रूग्णांची गंभीर स्थिती किंवा मृत्यू ५ ते १२ दिवसादरम्यान बघायला मिळतो. १२ दिवसांनंतर रूग्णांच्या जीवाला कमी धोका राहतो.

डॉ. सेठ म्हणाले की, इन्फेक्शन स्टेजच्या पाचव्या दिवशी रूग्णांना ब्लड थिनर इंजेक्शन दिलं जातं. उपचार संपल्यानंतरही अनेकदा यांची औषधे सुरू असतात. रूग्णाची स्थिती पाहूनच हे औषध दिलं जातं. इन्फ्लेमेटरी रिअॅक्शन किंवा ताप सतत पाच दिवस राहिल्यानंतर हे समजतं की, कदाचित रूग्णाला दोन दिवसांनी ऑक्सीजनची समस्या होऊ शकते. व्हायरस इन्फेक्शनमुळे थेट फुप्फुसाला समस्या होत नाही. हे इन्फ्लेमेशन वाढल्यामुळे होतं.

तेच मेदांताचे चेअऱमन डॉ. नरेश त्रेहन म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी वयाचे पुरूष जास्त संक्रमित झाले आहेत. गेल्यावेळीही आम्ही १० ते १५ टक्के पोस्ट कोविड-१९ रूग्णंमध्ये हार्ट इन्फ्लेमेशनशी संबंधित समस्या पाहिली. मात्र यावेळी ही रिअॅक्शन जास्त घातक आहे.

ते म्हणाले की यावेळी व्हायरसने लोकांच्या फुप्फुसाला जास्त डॅमेज केलं. ते असंही म्हणाले की, रूग्णांची ऑक्सीजिनेशन तेवढी प्रभावित झाली नाही जेवढा ताप आणि छातीत सीवियर इन्फेक्शन पाहिलं गेलं. त्यामुळे जेव्हाही एखादा रूग्णाला गंभीर लक्षणे दिसत असतील तर त्यांची कार्डियाक एको टेस्टही केली जावी. जेणेकरून समजेल इन्फ्लेमेशनने हार्ट मसल्सवर किती प्रभाव पडला.