CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:44 PM2021-05-03T17:44:10+5:302021-05-03T17:50:19+5:30

वैज्ञानिक मंडळी देशात अचानक वाढलेल्या या कोरोना महामारीवर अध्ययन करत आहेत. हे वैज्ञानिक प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्हेरियंटने देशात हैदोस घातला आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरनाने हाहाकार माजवला आहे. येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. देशाची राजधानी दिल्ली असो किंवा आर्थिक राजधानी मुंबई सर्वच ठिकाणी आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि औषधींचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी कोरोना स्थिती हाताबाहेर गेली आहे. (Corona virus what we know about the indian b1617 variant)

अता वैज्ञानिक मंडळी देशात अचानक वाढलेल्या या कोरोना महामारीवर अध्ययन करत आहेत. हे वैज्ञानिक प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्हेरियंटने देशात हैदोस घातला आहे.

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे नाव B.1.617 सांगण्यात येत आहे. भारतासह जर्मनी, बेल्जियम, युनायटेड किंगडम, स्वित्झरलंड, अमेरिका, सिंगापूर आणि फिजी सारख्या जवळपास 17 देशांत हा व्हेरियंट आढळून आला आहे. यामुळे आता जागतिक स्थरावर या व्हेरियंटसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. तर, जाणून घेऊयात हा नवा व्हेरियंट नेमका आहे तरी काय?

B.1.617 व्हेरियंटमध्ये व्हायरसच्या बाहेरील स्पाइक भागांत दोन प्रकारचे म्यूटेशन्स आढळतात. त्यांना E484Q आणि L452R, असे म्हटले जाते. हे कोरोनाच्या इतरही काही व्हेरियंट्समध्ये वेगळ्या पद्धतीने असतात. मात्र, एखाद्या व्हेरियंटमध्ये पहिल्यांदाच हे दोन्ही म्यूटेशन्स एकत्रितपणे दिसून आले आहेत.

व्हायरॉलॉजिस्ट शाहीद जमील यांनी एबीसी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनच्या विशेष भागात डबल म्यूटेशन धोका वाढवू शकतात. एवढेच नाही, तर हे व्हायरसला इम्यून सिस्टमच्या टार्गेटपासून वाचण्यासाठीही मदत करतात. स्पाइक प्रोटीन व्हायरसचा एक असा मुख्य भाग असतो ज्याच्या मदतीने तो मानवाच्या पेशीत दाखल होतो.

WHO ने या व्हेरियंटला काही इतर स्ट्रेनसोबत 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट'च्या रुपात रजिस्टर केले आहे. जे युनायटेड किंगडम, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेसारख्या देशांत पहिल्यांदाच आढळून आले आहेत.

आता प्रश्न उपस्थित होतो, की भारतातील या परिस्थितीला हाच व्हेरियंट जबाबदार आहे का? यावर बोलणेही घाईच ठरेल. WHO चे म्हणणे आहे, की यावर तत्काळ अभ्यास करायची गरज आहे. यासंदर्भात काही समजणे थोडे कठीणच आहे. कारण यूकेत पहिल्यांदाच आढळेला अत्यंत संक्रामक B.117 व्हेरियंट भारताच्याही काही भागांत आढळून आला आहे. राजधानी दिल्लीत अर्धा मार्च महिना संपल्यानंतर यूके व्हेरियंटची प्रकरणे जवळपास डबल झाली होती.

खरे तर या इंडियन व्हेरियंटचा संसर्ग झालेले अधिकांश रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.

या व्हिरियंटवर लशीचा काही फरक पडेल का? - सुरुवातीच्या संशोधनात सांगण्यात येत आहे, की या व्हेरियंटला आळा घालण्यात लस यशस्वी होऊ शकते. व्हाइट हाऊसचे चीफ मेडिकल अॅडव्हायझर अँथनी फाउची गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते, लॅब स्टडीजच्या सुरुवातीच्या डेटात समोर आले आहे, की 'भारत बायोटेक' ने तयार केलेली कोव्हॅक्सीन या नव्या व्हेरियंटला निष्क्रिय करण्यास प्रभावी आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडने (PHE) म्हटले आहे, ते काही आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसोबत यावर काम करत आहेत. मात्र, इंडियन व्हेरियंट आणि दोन इतर व्हेरियंटच या आजाराच्या गंभीरतेचे कारण आहे, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे प्रमाण मिळालेले नाही. भारतीय लस या नव्या व्हेरियंटला निष्क्रिय करू शकते. यासंदर्भातही अद्याप कसल्याही प्रकारचे प्रमाण नाही.

भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)च्या साथीने कोव्हॅक्सीन डेव्हलप केली आहे. कोव्हॅक्सीन ही एक इनअॅक्टिव्हेटेड लस आहे. ही लस आजार निर्माण करणाऱ्या व्हायरसला निष्क्रिय करून तयार करण्यात आली आहे.