Coronavirus: ओमायक्रॉन संक्रमण झालंय की नाही?; शरीरात सर्वात पहिलं दिसतं 'हे' लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:52 PM2022-01-25T19:52:23+5:302022-01-25T20:01:17+5:30

Coronavirus New Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.

गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीची दहशत अद्यापही लोकांच्या मनावर कायम आहे. कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे जगातील देशांचे टेन्शन वाढलं आहे. त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली.

आता ओमायक्रॉनसोबत सब व्हेरिएंट BA 2नेही लोकांची चिंता वाढली आहे. भारतासह अनेक देशात BA 2 रुग्ण आढळून येत आहेत. भारतात आतापर्यंत BA 2 चे ५३० सॅम्पल्स रिपोर्ट केले आहेत. आतापर्यंत कोरोनाचे २० पेक्षा अधिक लक्षणं समोर आली आहेत.

ज्यामुळे कधी आणि केव्हा कुठल्या व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागेल हे सांगणं कठीण आहे. अशावेळी ब्रिटनमध्ये काही तज्त्रांच्या मते, ओमायक्रॉनचं एक लक्षण असंही आहे जे आढळताच तात्काळ त्या व्यक्तीने कोरोना टेस्ट करणं गरजेची आहे.

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, जेव्हा तुम्ही कोरोना संक्रमित व्हाल तेव्ह सर्वात आधी तुमच्या घशात खवखवणे सुरु होते. ज्या लोकांनाही अशी लक्षणं दिसून येतात त्यांनी घरातच राहायला हवं आणि इतर सदस्यांपासून लांब व्हावं. त्याचसोबत कोविड चाचणी करुन घ्यावी.

शिकागो डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ कमिश्नर डॉ. एलिसन अरवाडी म्हणाले की, घसा खवखवणे हे कोरोनाचे सर्वात आधीचं लक्षण आहे. जर हे तुमच्यात आढळले तर कोरोना टेस्ट करुन घ्यावी. भलेही तुमच्या घशात खवखवण्याचं काही वेगळं कारण असो परंतु सौम्य संक्रमण असेल तरी तुम्ही घरात बसलं पाहिजे.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा, वास घेण्याची क्षमता कमी होते आणि भूक न लागणे हेदेखील जाणवते. त्याशिवाय लसीकरण केलेल्या लोकांच्या कानात वेदना होतात. तसेच पाय दुखणे हेदेखील कोरोनाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्टनेही कोरोनाच्या ३ लक्षणांचा खुलासा केला आहे. त्यात कफ, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. NHS द्वारे निर्धारित केलेले कोरोना व्हायरसची तीन प्रमुख लक्षणं जे मार्च २०२० पासून बदलले नाही.

या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अद्यापही खोकला, चव, वास घेण्याची क्षमता कमी होणे आणि हाय टेम्प्रेचर कोविड १९ च्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे जर तुम्हालाही अशाप्रकारे कुठलीही लक्षणं शरीरात आढळली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २ लाख ५५ हजार८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे