CoronaVirus News : आता भांग रोखणार कोरोना संक्रमण? औषध तयार, भारतात होऊ शकते चाचणी!

By ravalnath.patil | Published: September 21, 2020 01:44 PM2020-09-21T13:44:54+5:302020-09-21T14:08:21+5:30

कोरोना व्हायरसवर आता भांगपासून उपचार केला जाणार आहे. कॅनडातील एका फार्मा कंपनीने असे एक औषध तयार केले आहे. जे कोरोना व्हायरससाठी तयार केलेल्या लसींसारखे साइड इफेक्ट्स सुद्धा देत नाही.

या व्यतिरिक्त कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या हृदयाशी संबंधित आजारांपासून देखील आपले रक्षण करेल. सध्या ही कंपनी भारतात आपल्या औषधाची मानवी चाचणी करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करीत आहे.

इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, कॅनडामधील अकसीरा फार्मा (Akseera Pharma) या औषध कंपनीचे म्हणणे आहे की, भांगपासून तयार करण्यात आलेले उत्पादने अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांत कायदेशीर आहेत. कॅनडामध्येही बऱ्याच राज्यांमध्ये भांग कायदेशीर घोषित करण्यात आला आहे.

यापासून बनवलेल्या औषधांमध्ये साइकोअॅक्टिव्ह प्रॉपर्टी असते. हे मानवी मज्जासंस्थेला आराम करते. ज्यामुळे, शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना आणि समस्यांपासून आराम मिळतो.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार होतात. त्याला एरिथमिया (Arrhythmia) म्हटले जाते. या आजारात हृदयाचे ठोके व्यवस्थित काम करत नाहीत. कधी वेगाने तर कधी हळू ठोके कार्य करतात. सामान्यत: हृदयाचा ठोका सामान्य प्रवाहात असतो.

हृदयात जाणारे इलेक्ट्रिकल इंपल्सेस व्यवस्थित कार्य करत नाहीत, त्यावेळी हृदयात एरिथमिया होतो. जर योग्य वेळी त्याची तपासणी केली गेली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते किंवा हृदयातील इतर गंभीर आजार देखील उद्भवू शकतात.

अकसीरा कंपनीने कोरोनासाठी बनविलेले औषध कॅनाबिडिओल - सीबीडी (Cannabidiol - CBD) आहे. हे औषध अनेक आजारांवर उपयुक्त आहे. तीव्र वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होते.

याशिवाय, केमोथेरपीमुळे होणारे साइट इफेक्ट्स कमी करते. यात अँटीव्हायरल गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसवरही उपचार करेल, असा कंपनीचा दावा आहे.

कॅनाबिडिओल - सीबीडी या औषधामुळे हृदयाच्या पेशींमध्ये एरिथमियावर परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त, यामुळे हाय-ग्लुकोजमुळे होणारी समस्या देखील कमी होते.

ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये या औषधाचे वैद्यकीय अहवाल नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहेत. (फोटोः AFP)

Read in English