कानाचं दुखणं चुटकीसरशी होईल दूर, करा हे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:14 PM2019-01-03T17:14:08+5:302019-01-03T17:21:25+5:30

कान दुखणं किंवा कानातून पाणी येणं यांसारख्या समस्या थंडीमध्ये अनेकांना उद्भवतात. अशावेळी काय करावं हे सुचत नाही. अनेकांना वाटतं की, कानामध्ये मळ साचल्यामुळे कान दुखत आहे. त्यामुळे ते बर्ड किंवा एखाद्या काडीच्या सहाय्याने कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. त्यामुळे असं करण्याऐवजी तुम्हा काही घरगुती उपाय करू शकता.

कान दुखत असल्यास जवसचं तेल गरम करून त्याचे 2 ते 3 थेंब कानामध्ये टाकल्याने कानाच्या सर्व समस्या दूर होतात.

300मिली मोहरीच्या तेलामध्ये 50 ग्रॅम सुंठ, हिंग एकत्र करा. त्यानंतर हे तेल गाळून थेंब कानामध्ये टाकल्याने कानाच्या वेदना दूर होतील.

आलं बारिक वाटून त्याचा रस कापडाने गाळून घ्या. त्यानंतर हा रस कोमट गरम करून त्याचे 3 ते 4 थेंब कानामध्ये टाका. त्यामुळे कानाच्या वेदना दूर होतील.

ऑलिव्हच्या पानांचा रस गरम करून त्याचे काही थेंब पाण्यामध्ये टाकल्याने कान दुखण्याची समस्या दूर होते.

अर्जुन वृक्षाच्या पानांचा रस आणि कवठाच्या झाडाच्या पानांचा रस एकत्र करून कोमट गरम करा. या रसाचे काही थेंब कानामध्ये टाका. कान दुखण्याची समस्या दूर होईल.