गोव्यात इफ्फीसाठी जोरदार तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 08:36 PM2017-11-17T20:36:24+5:302017-11-17T20:57:04+5:30

गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्ताने पणजीत युद्धपातळीवर सगळी तयारी सुरू आहे.

गोवा मनोरंजन संस्थेसह सरकारच्या विविध यंत्रणा या कामामध्ये गुंतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या आयोजकांनी तसे जाहीर केले आहे.उद्घाटन सोहळ्यावेळीच भारतीय चित्रपट उद्योग संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

तसेच उद्घाटनानंतर कला अकादमीत इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्या बियोंड द क्वाऊड्स चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल.

टॅग्स :सिनेमाcinema