गोव्यात कला आणि संस्कृती खात्यातर्फे रंगारंग लोकोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:01 PM2018-01-12T23:01:28+5:302018-01-12T23:12:48+5:30

गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यातर्फे राष्ट्रीय पातळीवर मोठा लौकिक संपादन केलेल्या लोकोत्सव महोत्सव होतो.

यामध्ये देशभरातील लोककलांचा आविष्कार केला जातो. यंदाचं या लोकोत्सवाचं 19वं वर्षं आहे.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, गोवा कला अकादमी, गोवा क्रीडा प्राधिकरण, पणजी महापालिका, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि कला आणि संस्कृती खाते झारखंड यांच्या सहकार्याने आयोजित केलं आहे.

येत्या 12 ते 21 जानेवारी असे सलग 10 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

या महोत्सवात देशभरातील 16 राज्यांतील सुमारे पाचशे लोककलाकार आविष्कार करणार आहेत.

टॅग्स :गोवाgoa