फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक

By admin | Published: July 25, 2016 12:00 AM2016-07-25T00:00:00+5:302016-07-25T00:00:00+5:30

बॉलिवूड संघाचा कर्णधार अभिषेक बच्चन होता. त्याच्या संघात रणबीर अर्जुन कपूर दीनो मोरिया सिद्धार्थ मल्होत्रा सारखे अभिनेते होते.

अभिनेत्यांच्या संघ असलेल्या स्टार्स फुटबॉल क्लब आणि खासदारांमध्ये हा फुटबॉलचा सामना खेळवण्यात आला होता.

योगगुरू रामदेव बाबांनी चक्क धोतीवरच शूज घालून फुटबॉल खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.

रामदेव बाबांनी मैदानावर एखाद्या पारंगत फुटबॉलपटूसारखी किक मारून अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना खेळत असताना रामदेव बाबांनी मारलेली किक पाहून सगळेच अवाक् झाला.

नरेंद्र मोदींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ स्किल इंडिया स्वच्छ भारत सारख्या अभियानांना मजबूत करण्यासाठी स्टार्स फुटबॉल क्लब आणि खासदारांमध्ये हा फुटबॉलचा सामना खेळवण्यात आला .