Photos : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं टाईम्स स्क्वेअरवर सुरू केलं नवं आलिशान हॉटेल, एका रात्रीचं भाडं ११७ पाऊंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:12 PM2021-07-09T12:12:05+5:302021-07-09T12:26:03+5:30

यूरो २०२० स्पर्धेतील पराभवानंतर पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो कुटुंबीयांसोबत सुट्टीवर आहे.

जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं त्याच्या CR7 या हॉटेलची एक शाखा न्यू यॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर येथे सुरू केली आहे. ( CRISTIANO RONALDO has launched his latest hotel in New York’s Times Square to add to his collection.)

पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोनं सोशल मीडियावर त्याच्या नव्या हॉटेल्सचे भारी फोटो पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ३६ वर्षीय रोनाल्डोनं यापूर्वी मडैरा, लिस्बन आणि माद्रिद येथे CR7 हॉटेल तयार केले आहे.

युरोपमधील सर्वात सुंदर हॉटेलमध्ये आताच बुकींग करा असं आवाहन रोनाल्डोनं केले अन् सोबत काही फोटोही पोस्ट केले. Pestana guest club मेंबर्ससाठी एका रात्रीचे हॉटेल भाडे हे ११७ पाऊंड म्हणजेच भारतीय रकमेत १२ हजार रुपये आहेत.

पोर्तुगीज इतिहासाची साक्ष देणारे रंग अन् आर्ट या हॉटेल्सच्या गेस्ट रूम्सना देण्यात आले आहेत. त्याशिवाय अनेक लक्झरीयस सुखसुविधाही आहेत.

रोनाल्डोचे मडैरा येथील हॉटेल

२०१६मध्ये त्यानं लिस्बन येथे हॉटेल सुरू केले होते.

माद्रिद येथेही त्याचे हॉटेल आहे.