...जेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड डान्स फ्लोअरला 'आग' लावते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:58 PM2020-02-07T15:58:01+5:302020-02-07T16:00:16+5:30

जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आणि महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं नुकताच आपला 35वा वाढदिवस साजरा केला. रोनाल्डोला बर्थ डे गिफ्ट म्हणून गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रीगेजनं महागडी गाडी दिली. त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

पण, शुक्रवारी रोनाल्डोच्या गर्ल्डफ्रेंडचे आणखी एक रुप पाहायला मिळाले. जॉर्जियानं इटलीतील एका डान्स शोमध्ये सहभाग घेताना इटालिया टिव्ही स्टार अमाडीससोबत स्टेजला आग लावली. तिच्या या नृत्यानं अनेकांना घायाळ केलं.

स्पेनच्या जाका शहरात जन्मलेल्या जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे. लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची. जॉर्जिनाच्या वडिलांना अमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी दहा वर्षांचा कारावास झाला होता.

2016मध्ये रोनाल्डोसोबत अनेकदा डेटवर दिसल्यानं ती चर्चेत आली. नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले.

रोनाल्डोची प्रेयसी ही ओळख बनण्यापूर्वी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची. त्या स्टोरमध्येच रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्यात नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत.