'व्हॉट अ‍ॅन आयडिया' - Waste Food पासून 'टेस्टी आईसक्रीम' बनवूया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:37 PM2019-02-13T14:37:40+5:302019-02-13T14:48:57+5:30

आपण अनेकदा जेवण करताना ताटात काही पदार्थ तसेच ठेवतो, आजही देशात भुकबळीच्या घटना घडतात. मात्र, आपण बिनधास्तपणे अन्नाची नासाडी करत असतो.

आपण अन्नाची नासाडी करण्यापेक्षा भुकेलेल्यास ते अन्न दिलं पाहिजे, किंवा जेवण करताना उरलेल्या अन्नापासून काहीतरी डेलिशिअस पदार्थ बनवला आहे.

एका अहवालानुसार जगभरात एका वर्षाला तयार होणाऱ्या एकूण अन्नापैकी 1.3 बिलियन्स टन अन्न वाया जात असल्याचं समोर आलं आहे.

पोर्टलँडमधील एका इंस्टीट्युटने खराब किंवा वाय जाणाऱ्या अन्नापासून टेस्टी आईसक्रीम बनविण्याची संकल्पना सत्यात उतरवली आहे. पांढऱ्या रंगाची ही आईसक्रीम वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवता येईल.

साल्ट अँड स्ट्रॉ असे या आईसक्रीमचे नाव असून कंपनीचे संस्थापिका किम मलेक यांनाही अमेरिकेत 40 टक्के अन्न वाया जात असल्याचं पाहून धक्काच बसला.

ग्राहकांसाठी अतियश चविष्ट आणि त्यांना आवडेल अशी ही आईसक्रीम असल्याचं त्यांच म्हणणं आहे. तर, ग्राहकांनाही या संकल्पनेचं कौतुक वाटत असल्याचं त्यांनी सांगितलंय.