या 'भन्नाट रेस्टॉरंट'मध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायलाच हवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:07 PM2018-10-08T15:07:58+5:302018-10-08T15:13:03+5:30

हैदराबादमधील या हॉटेलची थीम स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1857 च्या काळातील ब्रिटीश पद्धतीने येथे जेवण वाढण्यात येतं.

मुंबईतील द बार स्टॉक एक्सचेंज ही एक भन्नाट कल्पना आहे. या हॉटेलमध्ये कुठल्याही ड्रिंक्स आणि पदार्थाचे फिक्स रेट नाहीत. ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे येथे दरात सवलत मिळते.

जयपूरच्या चोखी धानी हे राजस्थानी गाव खेड्यातील पद्धतीने मेजवाणी देणार हॉटेल आहे. गुलाबी शहर असलेल्या जयपूरमध्ये तुम्हाला या पारंपरिक पद्धतीने जेवणाचा आनंद घेता येईल.

नवी दिल्लीतील कन्झूम ट्रॅव्हल कॅफे हा आरामदायी चहा वा कॉफी पिण्याचा अड्डा आहे. येथे तुम्हाला पुस्तकांची पाने चाळत अन् चित्रांच्या फ्रेमचे निरीक्षण करत चहा-कॉफीचा आनंद घेता येईल.

कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथील कैदी किचन रेस्टॉरन्टमध्ये एका मजेशीर भोजनाचा आस्वाद घेता येईल. तुरुंगाच्या आकारातील या हॉटेलमध्ये पोलिसांच्या वेशात वेटर जेवण सर्व्ह करतात.