जगातील महागडी पण विचित्र फळं, चौकोनी कलिंगड अन् लाफिंग बुद्धाच्या आकाराचा नासपती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 02:08 PM2018-04-13T14:08:42+5:302018-04-13T15:16:01+5:30

भारतात भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये वेगवेगळे प्रकार सहजरित्या उपलब्ध असतात. पण तुम्ही कधी ३००० डॉलर्सचा आंबा किंवा चौकोनी आकाराचा कलिंगड पाहिलाय का? नाही ना? असेच काही जगभरातील फळांचे विविध प्रकार व त्यांचे दर पाहून तुम्हालाही विश्वास ठेवणं अशक्य होईल.

१) नासपती बुद्धा – चायनामध्ये मिळणाऱ्या या नासपती फळाचा आकार विशिष्ट प्रकारच्या साच्यामध्ये पिकवल्यामुळे लाफिंग बुद्धासारखा दिसतो. या फळाची किंमत प्रत्येकी ८ डॉलर इतकी आहे.

२) सेकाई इची सफारचंद – जगातले आकाराने सर्वात मोठे व सर्वात महागडे सफरचंद म्हणून सेकाई फळ ओळखले जाते. या सेकाई सफरचंदची किंमत २१ डॉलर्स इतकी आहे.

३) जपानी आंबा – जपानी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. आकाराने मोठा व किंमतीनेही तितक्याच मोठ्या अशा या आंब्याची किंमत प्रत्येकी ३००० डॉलर्स इतकी आहे.

४) अननस – या फळाचा आकार साधारण दिसत असला तरी इंग्लडमधील लॉस्ट गार्डन इथे पिकणाऱ्या या एका अननसाची किंमत १५००० इतकी आहे.

५) डेकोपॉन संत्री – जगातली चवीला सर्वात गोड समजली जाणारी संत्री म्हणून ही संत्री ओळखली जातात. आकाराने मोठ्या या संत्री अनुकूल वातावरणाअभावी पिकवणं कठिण असतं.