चमत्कार! जपानी शास्त्रज्ञांनी तयार केले न वितळणारे आईस्क्रीम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:28 PM2018-08-30T15:28:25+5:302018-08-30T15:41:34+5:30

आईस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती विरळाच. हे आईस्क्रीम उघड्यावर फार काळ राहिल्यास वितळते, पण जपानमधील शास्रज्ञांनी न वितळणारे आईस्क्रीम विकसित केले आहे.

जपानमधील कनजावा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही कमाल करून दाखवली आहे.

या शास्त्रज्ञांनी आईस्क्रीमचा मेल्टिंग पॉइंट वाढवून त्याचा आकार कायम राखण्याची पद्धत शोधून काढली आहे.

संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी आईस्क्रीम वेगवेगळ्या तापमानात ठेवले. तसेच हेअर ड्रायरने त्याच्यावर गरम हवाही सोडली. मात्र आईस्क्रीम वितळले नाही.

शास्त्रज्ञांनी आईस्क्रीममध्ये पॉलिफेनॉल नावाचा पातळ पदार्थ मिसळला आहे. हा पदार्थ स्ट्रॉबेरीमधून मिळतो. पॉलिफेनॉल हा पाणी आणि तेल एकमेकांपासून विलग होण्यापासून रोखतो.