उन्हाळ्यात वापरा पुदिना; सौंदर्यासोबत आरोग्यासाठीही गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:48 PM2019-04-15T19:48:02+5:302019-04-15T19:56:47+5:30

पुदिन्याची चटणी, जलजीरा किंवा मग एखाद्या रायत्यावर सजवण्यात आलेली पुदिन्याची पानं असोत. कोणत्याही जेवणाची चव वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. उन्हाळ्यामध्ये यांचं महत्त्व आणखी वाढतं. उन्हामधून थकून आल्यानंतर थोडासा जलजीरा प्यायल्यानेही फ्रेश वाटतं. याची चवीएवढाचं याचा वापर करणंही सोपं आहे. पुदिना चवीसोबतच उन्हाळ्यातील इतर समस्यांवर औषधं म्हणून वापरता येतो. जाणून घेऊया पुदिन्याच्या काही आरोग्यदायी फायद्यांबाबत...

पुदिन्याच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या चटणीचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. याची चटपटीत चव जेवणाचा आनंद द्विगुणित करण्यास मदत करते. तसेच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. (Image Credit :VegeCravings)

पुदिन्यामधील अनेक पोषक तत्व पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासोबतच इतर समस्याही दूर करते.

जर तुमच्या तोंडातून दुर्गंध येत असेल तर पुदिन्याची काही पानं चावल्याने ही समस्या दूर होते. नियमितपणे पुदिन्याच्या पाण्याने गुळण्या केल्याने फ्रेश वाटते.

पुदिना त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या स्किनच्या समस्या पुदिन्याच्या सेवनाने दूर होतात. पुदिन्याची ताजी पानं वाटून चेहऱ्यावर लावल्याने थंडावा मिळतो.

उन्हाळ्यामध्ये सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी पुदिन्याचा वापर करा. याचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. पोटातील उष्णता कमी करण्यासाठीही पुदिना मदत करतो. पुदिन्याला जीरं, काळी मिरी आणि हिंगासोबत एकत्र करून खाल्याने आराम मिळतो.

कॉलर झाल्यानंतर पुदिन्याचा वापर केल्याने फायदा होतो. पुदिना, कांद्याचा रस, लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्याने फायदा होतो. (Image Credit : R&D Magazine)

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.