भारताच्या 'या' रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचा आनंद घ्याल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 03:12 PM2019-12-21T15:12:42+5:302019-12-21T15:48:41+5:30

जर तुम्ही भारतात राहत असाल तर प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवरच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतातल्या कोणत्या रेल्वे स्थानकांवर कोणकोणते खाद्य पदार्थ मिळतात.

पंजाब आणि पंजाबी लोक हे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून ओळखले जातात. जर तुम्ही पंजाबला गेलात तर त्याठिाकाणी जालंदर या ठिकाणी जाऊन छोले भटुरे खाऊ शकता. या ठिकाणी छोले भटुरे खाल्यानंतर तुम्ही इतर ठिकाणंची चव विसरून जाल.

वेस्ट बंगालच्या खडगुर या रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर मसालेदार दम आलू खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

दक्षिण भारतातल्या केरळच्या एर्नाकुलम जंक्शनचे पकोडे खायला विसरु नका. हे पकोडो कच्च्या केळ्यापासून तसंच मैदा आणि डाळीच्या पीठापासून तयार केले जातात.

रतलाम या स्टेशनचे नाव ऐकून तुम्हाला जब वी मेट सिनेमाची आठवण येईल. जर तुम्ही या ठिकाणचे पोहे खाल तर इतर ठिकाणचे पोहे खायला विसरून जाल. इथे पोहे रतलामी सेव, लिंबू आणि कच्च्या कांद्यासोबत दिले जातात

राजस्थानच्या अबूरोड स्टेशन वर तुम्हाला भरपूर लोक हे रबडी खाताना दिसतील. या ठीकाणी तुम्ही रबडी खाण्याचा आनंद घेऊ शकता.

जर तुम्हाला कर्नाटकला जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही याठिकाणच्या मद्दुर रेल्वे स्थानकातील मद्दुरवडे खाण्याचा आनंद नक्की घ्या. चहाससोबत हे वडे खायला खूप चविष्ट लागतात.

केरळच्या कालीकत स्टेशनवर कोझिकोडन हलवा वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या रंगात मिळतो. ही स्वीट डिश संपूर्ण शहरात मिळते.पण स्टेशनच्या या हलव्यासारखी चव कुठेही मिळत नाही.