हिरव्या वेलचीपेक्षा काळया वेलचीच्या सेवनाने अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 03:14 PM2020-02-26T15:14:48+5:302020-02-26T15:39:26+5:30

स्वयंपाकघरात नेहमी वेलची असते. आपण नेहमी आहारात वेलचीचा समावेश करताना चहामध्ये त्याचा वापर करत असतो. हिरवी लहान वेलची आपल्याला माहित असते. मोठ्या वेलचीला काळी वेलची असं सुद्धा म्हणतात. या वेलचीचा वापर फारसा केला जात नाही.

सुगंधीत आणि अनेक औषधी गुणधर्म या वेलचीचे आहेत. अनेक शारीरिक समस्यांना दूर करण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत मोठी वेलची खाण्याचे फायदे

हृदयासाठी फायदेशीर-काळी वेलची ही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते. ब्लड प्रेशन नियंत्रणात राहण्यासाठी वेलचीचे नियमीत सेवन करणं गरजेचं आहे. शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ही वेलची फायदेशीर ठरत असते

पोटाचे विकार- काळी वेलची पोटातील एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे एसिडीवर होऊ नये म्हणून नियमीत वेलचीचे सेवन करा. गॅस्ट्रिक अल्सर आणि पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी वेलची गुणकारक ठरते. खालेल्या अन्नाचे पचन होऊन पोटसाफ होण्यासाठी आहारात या वेलचीचा समावेश करावा.

श्वासांचे विकार-दमा, खोकला फुप्पुसांमध्ये सुज येण्याच्या समस्या तसचं ब्रॉन्काइटिस, पल्‍मोनरी ट्यूबरकुलोसिस यांसारख्या गंभीर समस्या वेलची या मसाल्याच्या पदार्थामुळे दूर होऊ शकतात. त्यामुळे फुप्पुसांच्या माध्यामातून शरीरात हवेचे संचारण व्यवस्थित होते.

ओरल हेल्थ-अनेक दातांचे रोग, इन्फेक्शन आणि हिरड्यांची सुज यांवर उपाय म्हणून वेलचीचं सेवन करणं फायदेशीर ठरत असतं. त्यासह वेलचीचे सेवन तुम्ही केले तर तोंडातून येणारा दुर्गंध कमी होतो.

किडनी साफ करण्यासाठी फायदेशीर- काळी वेलची ही एक प्रभावी मुत्रवर्धक असल्यामुळे लघवी लागण्याची समस्या दूर होण्यासाठी तसंच मुत्राशय स्वच्छ करून मुत्र बाहेर फेकले जाते. किडनीसाठी फायदेशीर असणारं आहे.

स्काल्पचं इन्फेक्शन होतं दूर- काळ्या वेलचीत एंटिऑक्सिडंट्स असतात. ते तुमच्या स्काल्प आणि केसांना पोषण देण्यासाठी आवश्यक असतात. वेलचीचे सेवन केल्यामुळे केसांमधिल कोंडा कमी होतो. तसचं खाज-खुजली येण्याचं प्रमाण कमी होतं. ( image credit- steamit)

त्यामुळे आजारांपासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर मोठ्या वेलचीचा आहारात समावेश करा.