दररोज खा दोन केळी; उच्च रक्तदाब अन् तणाव होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 12:06 PM2019-07-31T12:06:31+5:302019-07-31T12:16:06+5:30

अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. एका केळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी दररोज आवश्यक असणाऱ्या एकूण व्हिटॅमिन बी6 पैकी 20 टक्के आणि एकूण व्हिटॅमिन सी पैकी 15 टक्के हिस्सा असतो. हे आपल्या शरीराला इन्सुलिन, हिमोग्लोबिन आणि अमिनो अॅसिड तयार करण्यासाठीही मदत करतं. ही सर्व पोषक तत्व शरीराला पेशी तयार करण्यासाठी आवश्यक ठरतात. जाणून घेऊया जर तुम्ही दररोज 2 केळी खात असाल तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो त्याबाबत...

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दररोज दोन केळी खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण केळ्यामध्ये जवळपास 420 मिलीग्रॅम पोटॅशिअम असतं. जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच हे रक्तवाहिन्यांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं.

केळ्यामध्ये असलेलं पोटॅशिअम स्नायू बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच यामधील कार्बोहायड्रेट शरीराला मुबलक ऊर्जा देण्यासाठी मदत करतं.

केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतं, जे आपल्या शीरीराला सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी मदत करतं. एका केळ्यामध्ये जवळपास 27 मिलीग्रॅम मॅग्नेशिअम असतं. ही सर्व पोषक तत्व तणाव दूर करून मूड चांगला ठेवण्यासाठी तसेच शांत झोपेसाठी मदत करतात.

केळी पचण्यासाठी हलकी असतात. गॅस्ट्रो-इंटेस्टायनल ट्रॅक्टला त्रास देत नाही. केळीमध्ये असलेला प्रतिरोदी स्टार्च पचत नाही. तो मोठ्या आतड्यांमध्ये समाप्त होतो. हा शरीरासाठी चांगल्या बॅक्टेरियाच्या रूपात काम करतो.

केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. केळ्यामधील स्टार्च भूक कमी करतं. यामुळे वजन वाढत नाही. हे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करतं.

केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असतं, जे शरीरातील लाल रक्त पेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी मदत करतं. तसेच केळ्यामधील व्हिटॅमिन बी6 साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं. अनिमियाची लक्षणं दूर करण्यासाठी केळ अत्यंत फायदेशीर ठरतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.