लसूण आणि मधाचे मिश्रण ठरते आरोग्यदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:15 PM2018-11-24T18:15:56+5:302018-11-24T18:23:15+5:30

लसूण आणि मध या दोघांमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक घटकांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे यामध्ये शरीराला आवश्यक असणारी खनिजंही मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदामध्येही या पदार्थांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. हे वेगवेगळं खाण्याचे अनेक फायदे आहेतच त्याचबरोबर एकत्र खाल्यामुळेही शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊयात लसूण आणि मधाचे फायदे आणि कसं तयार करावं हे मिश्रण त्याबाबत...

लसूण - एखद्या पदार्थाची चव वाढविण्यासोबतच खनिजं आणि बायोअॅक्टिव्ह कंपाउंडमधून शरीराला अनेक फायदे होतात. कच्चा लसूण हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल यांसारख्या अनेक आरोग्याच्या समस्यांपासून सुटका करून घेण्याचा एक घरगुती उपाय आहे.

मध - मधामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट आणि एंजाइम मुबलक प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, आयर्न, झिंक, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि शियामिन यांसारखी पोषक तत्वही मोठ्या प्रमाणावर असतात.

लसूण आणि मध - यासाठी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्यांची साल काढून घ्या. एका काचेच्या बरणीमध्ये टाका. त्यानंतर त्यामध्ये जवळपास 335 ग्रॅम मध एकत्र करा. लसणाच्या पाकळ्या मधामध्ये पूर्णपणे मिक्स होतील याची काळजी घ्या. त्यानंतर बरणीचे झाकण घट्ट लावून टाका आणि काही दिवसांसाठी हे मिश्रण तसंच ठेवा. त्यानंतर दररोज लसणाची एक पाकळी अनोशापोटी खा.

वजन कमी करण्यासाठी परिणामकारक - वजन कमी करण्यासाठी लसूण आणि मधाचा वापर करणं हा एक उत्तम पर्याय आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असल्यास या मिश्रणाचे सेवन करा.