कोट्यवधींची किंमत असलेले शूज कधी पाहिले आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 04:14 PM2019-07-22T16:14:38+5:302019-07-22T16:32:09+5:30

तुम्हाला जर कोणी सांगितलं की, माझे शूज 1 कोटीपेक्षाही महाग आहेत. तर तुम्ही काय कराल? पहिलं तर तुम्ही त्याच्या शूजकडे पाहाल आणि नंतर त्या व्यक्तीच्या तोंडाकडे पाहून मोठ्याने हसाल... पण असं हसू नका. कारण जगात असे शूज अस्तित्वात आहेत, ज्यांची किंमत काही खास कारणांमुळे कोट्यावधी रूपयांमध्ये आहे. जाणून घेऊया अशाच काही खास शूजबाबत...

हे शूज खासकरून 2015मध्ये एका रॅपर फॅमिली आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी तयार करण्यात आले होते. हे शूज फार खास होते. काही कालावधीनंतर यांपैकी काही शूजसाठी बोली लावण्यात आली. लिलावामध्ये हे शूज तब्बल 8,46,000 रुपयांना विकण्यात आले होते.

हे शूज 1989मध्ये हॉलिवूडमध्ये तयार करण्यात आलेल्या 'बॅक टु द फ्युचर 2'मध्ये दाखवण्यात आलेल्या शूजची कॉपी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. यामुळे इतर ड्रेसेससोबतच या शूजनाही वेगळी ओळख मिळाली होती. शूजच्या 2016 एडिशनला स्टॉकएक्स वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळाला. त्यावेळी हे शूज तब्बल 6,88,000 रुपयांना विकला गेला होता.

जगभरातील उत्तम स्नीकर डिझायनरांपैकी एक असलेल्या डोमिनिक चेम्ब्रॉन यांनी आपल्या ब्रँड अम्बेसिडर लेब्रॉन जेम्ससाठी डिझाइन केले होते. हे शूज सुसरीच्या चामड्यापासून तयार करण्यात आले होते. एवढंच नाहीतर यावर 24 कॅरेट सोनं आणि हिरेही जडवण्यात आले होते. हे शूज तब्बल 68,87,000 रुपयांना विकण्यात आले होते.

या शूजची कहानी खरं तर बास्केटबॉलशी संबंधित आहे. प्रसिद्ध रॅपर ड्रेक यांनी 2014मध्ये एका बास्केटबॉल मॅचमध्ये हे शूज वेअर केले होते. मॅच संपल्यानंतर त्यांनी आपले शूज एका फॅनला दिले. ज्याने नंतर ते तब्ब्ल 68,88,000 रूपयांना विकून टाकले होते.

अमेरिकेतील प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेअर माइकल जॉर्डन यांनी 1997मध्ये एनबीएच्या फायनलमध्ये नाइकीचे हे शूज वेअर केले होते. आधीपासूनच आजारी असलेल्या जॉर्डन यांनी या मॅचमध्ये 38 पॉइंट्स कमावले होते. या ब्लॅक अॅन्ड रेड शूज 2013मध्ये विकण्यात आले. हे शूज जवळपास 71,61,000 रुपयांना विकण्यात आले होते.

मायकल जॉर्डनने हे शूज 1984 ऑलिंम्पिकच्या बास्केटबॉल फायनल मॅचसाठी वेअर केले होते. या मॅचमध्ये यूएसने स्पेनला हरवलं होतं. 2017मध्ये या शूजवर बोली लावण्यात आली तेव्हा इतर सर्व शूजचे रेकॉर्ड मोडित निघाले. हे शूज जवळपास 1,30,72,000 रूपयांना विकण्यात आले होते.