#SareeTwitter बॉलिवूड बालांच्या साडीतील दिलखेचक अदा; सर्वच होतील फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:13 PM2019-07-22T15:13:06+5:302019-07-22T15:34:01+5:30

काही दिवसांपासून सोशल मीडियावर #SareeTwitter ट्रेंड करत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य महिला हा ट्रेंड फॉलो करत साडीतील आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशातच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी अनेकदा साडीला पसंती देत असतात. त्यांचे साडीतील फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, 'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला'

करिना कपूर म्हणजेच बॉलिवूडची बेबो अनेक तरूणींची फॅशन आयकॉन आहे. करिना आपल्या आउटफिट्समध्ये ती नेहमीच वेगवेगळ्या एक्सपरिमेंट करताना दिसून येते. तसेच बॉलिवूडमध्ये अनेक फॅशन ट्रेंड सेट करते. परंतु, अनेकांना करिनाचा साडी लूक फार आवडतो. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिश मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली व्हाइट कलरची प्लेन साडी करिनाने व्हाइट आणि सिल्वर कलरच्या डिझायनर शिमरी ब्लाउजसोबत टीमअप करून वेअर केली होती.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या साडी लूकवर अनेक चाहते घायाळ होतात. अनेक इव्हेंट्स आणि ओकेजन्ससाठी ती साडी वेअर करणं पसंत करते. अंबानींच्या घरी झालेल्या एका इव्हेंटसाठी प्रियांकाने डिझायनर तरुण तहिलियानीने डिझाइन केलेली ग्रे कलरची साडी वेअर केली होती. तसेच आपला दिर म्हणजेच, जो जोनस आणि सोफी टर्नरच्या लग्नातही प्रियांकाने पिंक कलरची नेटेड साडी वेअर केली होती.

जेव्हा गोष्ट साडीबाबत असते, त्यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी शिल्पा शेट्टीचं नाव पहिलं असतं. सध्या शिल्पाने साड्यांना एक नवीन ट्विस्ट दिला आहे. शिल्पा नेहमीच आपल्या साड्यांसोबत एक्सपरिमेंट करताना दिसून येते. मग ती सोनाक्षी राजने डिजाइन केलेली गोल्डन आणि क्रिम कलरची रफ्फल साडी असो किंवा तरुण तहिलायानीने डिझाइन केलेली व्हाइट कलरची साडी. दोन्ही लूक हटके स्टाइलने कॅरी करताना दिसून आली शिल्पा.

आलिया भट्ट ट्रेडिशनल लूकमध्ये फार सुंदर दिसते. तरुण तहिलियानी द्वारे डिझाइन केलेली रेड पिंक, ग्रीन आणि गोल्डन कलरची हेव्ही वर्क असलेली साडी असो किंवा सब्यासाचीने डिझाइन केलेली रेड प्लेन नेटेड साडी. दोन्ही लूकमध्ये आलिया हटके दिसत होती.

दीपिका पादुकोण त्या अभिनेत्रींपैकी आहे, जी वेस्टर्न ड्रेसऐवजी साडीमध्ये जास्त दिसून येते. साडीमध्ये दीपिकाचा लूक सर्वांपेक्षा भारी दिसतो.

सोनाक्षीचा रफ्फल साडी लूक

माधुरीच्या दिलखेचक अदा

कतरिनाचा क्लासी अंदाज

रेखाच्या मनमोहक अदा

ऐश्वर्याचा ट्रेडिशनल साडी लूक

श्रद्धा कपूरचा सिम्पल पण क्लासी साडी लूक

सोनमचा मेटालिक साडी लूक