'देवदास'पासून 'कलंक'पर्यंत क्लासी ठरले माधुरीचे रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:24 PM2019-04-18T18:24:04+5:302019-04-18T18:27:46+5:30

बॉलिवूडची सौदर्यवती आणि आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी माधुरी दीक्षित वयाच्या ऐन पन्नाशीतही भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. माधुरीच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा कलंकमध्ये चाहत्यांना अनुभवण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमधील जर तुम्ही माधुरीच्या लूक पाहिला तर , ट्रेडिशनल अंदाजामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. माधुरीने आपल्या आतापर्यंतच्या करियरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. तिचे कर्ली हेयर्स आणि मॉर्डन आउटफिट गेटअपदेखील अनेक चित्रपटांमध्ये गाजले. परंतु लग्नानंतर जर तुम्ही माधुरीचे लूक्स नीट लक्ष देऊन पाहिले तर ती जास्त ट्रेडिशनल लूक्सना पसंती देताना दिसते. तिचे हे सर्व लूक्स चाहत्यांच्याही पसंतीस पडतात.

1994मध्ये 'हम आप के है कौन' या चित्रपटातून माधुरी प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटातील लूकही भलतेच गाजले होते.

1999मध्ये माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर माधुरीने देवदास चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटात माधुरीने साकारलेली चंद्रमुखीची भूमिका विशेष गाजली असून त्यासोबतच तिचे ट्रेडिशन अटायरदेखील फॅशन स्टेटमेंट बनले होते.

देवदास चित्रपटानंतर माधुरीने इंडस्ट्रीमधून मोठा ब्रेक घेतला आणि अमेरिकेमध्ये शिफ्ट झाली. 2007मध्ये माधुरीने अनिल मेहता यांचा चित्रपट 'आजा नचले'मधून कमबॅक केलं. या चित्रपटाचं गाणं आजा नचले जबरदस्त हिट झालं होतं. त्याचबरोबर गाण्यामध्ये माधुरीने वेअर केलेला ब्लू आणि ब्लॅक लेहेंगाही चाहत्यांमधअये हिट ठरला होता.

2013मध्ये माधुरीने एक स्पेशल डान्स नंबर 'ये जवानी है दीवानी'मध्ये केलं होतं. या चित्रपटातील गाणं आणि माधुरीची ड्रेसअप स्टाइल दोन्ही चाहत्यांनी डोक्यावर घेतली होती.

2014मध्ये माधुरी दीक्षितने देढ इश्कियामध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली होती. या चित्रपटामध्ये माधुरीने नवाब साहबच्या बेगमची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये माधुरीची ड्रेसअप स्टाइल आणि लूकही चाहत्यांना फार आवडला होता.

2014मध्ये माधुरीचा गुलाब गँगही रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये माधुरी पिंक साडीमध्ये दिसून आली होती.

माधुरीने मराठी चित्रपटसृष्टीमध्येही पदार्पण करत 2018मध्ये रेणुका शहाणेसोबत मराठी चित्रपट बकेट लिस्टमध्ये दिसून आली. बकेट लिस्टमध्ये माधुरीने गृहिणीची भूमिका निभावली होती. या चित्रपटामध्ये माधुरीने सिम्पल साडी वेअर केली होती.