जान्हवी कपूर, सारा अली खान नव्हे; सध्या 'ही' स्टार किड्स सर्वाधिक चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 03:49 PM2019-01-05T15:49:57+5:302019-01-05T15:56:20+5:30

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. सध्या दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान या दोघींनीही दणक्यात बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला. पण आणखी एका स्टार किडची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे. अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर अनेक मुलांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ती लवकरच चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शनायाचा फॅशन सेन्स फार चांगला आहे. मग ते इंडियन ट्रेडिशनल आउटफिट्स असो किंवा वेस्टर्नवेअर. कोणत्याही लूकमध्ये ती फॅशनेबल आणि स्टायलिश दिसते.

शनाया आता फक्त 19 वर्षांची असून ती सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. सध्या तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सोनम कपूर, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर, आपल्या तीन बहिणींप्रमाणे शनायाही फॅशन आणि स्टाइलबाबत फार कॉन्शिअस आहे.

रेड कलर शनायावर फार सुंदर दिसत असून रेड कलरचा शॉर्ट ड्रेस असो किंवा स्कर्ट . दोन्ही लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे.

मागील काही दिवसांमध्ये shimmery आणि glitteryड्रेसेस फार ड्रेंडमध्ये आहेत. शनायादेखील अॅश ब्ल कलरच्या फुल स्लीव्सच्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

इंडियन ट्रडिशनल वेअरमध्ये शनाया एखाद्या राजकन्येप्रमाणेच दिसते. कॉरसेट डिजाइन केलेल्या ब्लाउजसोबत पिंक कलरचा लेहेंगा असो किंवा ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत वेअर केलेला क्रिम कलरचा लेहेंगा. दोन्ही लूकमध्ये ती खुप गोड दिसत होती.

कॅज्युअल वेअर लूकमध्ये डेनिम शॉर्ट स्कर्ट आणि व्हाइट टी-शर्ट लूकमध्ये फार स्टनिंग दिसत होती शनाया.